PM किसान योजनेचा हप्ता अडकणार? हे अपडेट न केल्यास होणार नुकसान…!
19-05-2025

शेअर करा
PM किसान योजनेचा हप्ता अडकणार? हे अपडेट न केल्यास होणार नुकसान…!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता जून महिन्यात वितरित होणार आहे. मात्र अनेक शेतकरी ई-केवायसी, बँक आधार सिडिंग व फार्मर आयडी अभावी या लाभापासून वंचित राहू शकतात.
31 मे अंतिम तारीख: या कामांवर भर द्या!
ई-केवायसी अपडेट करा:
- मोबाईल अॅपवरून चेहरा / अंगठा स्कॅन.
- महा ई-सेवा केंद्र किंवा कृषी सहायक यांच्याकडून मदत.
नवीन नोंदणी (PM-Kisan साठी):
- फेरफार पोर्टलवर माहिती अपलोड.
- महा ई-सेवा केंद्रात नोंदणी सुविधा.
बँक खाते आधार सिडिंग:
- बँकेत जाऊन सिडिंग प्रक्रिया पूर्ण करा.
- पोस्ट ऑफिसमध्ये DBT खाते उघडा.
फार्मर आयडी अनिवार्य:
- ‘नमो शेतकरी’ आणि इतर योजनांसाठी.
- पीएम किसान पेन्शन लाभार्थी देखील फार्मर आयडी बनवणे आवश्यक.
'नमो शेतकरी' लाभासाठी आवश्यक अटी:
बाब | अंतिम तारीख | गरज |
---|---|---|
ई-केवायसी | 31 मे 2025 | चेहरा/अंगठा प्रमाणीकरण |
आधार सिडिंग | 31 मे 2025 | बँक खाते लिंक करणे |
फार्मर आयडी | 31 मे 2025 | अनिवार्य दस्तऐवज |
नवीन नोंदणी | 31 मे 2025 | फेरफार पोर्टल / सेवा केंद्र |
टीप:
कृपया या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.