पोल्ट्री व्यावसायिक ३ जुलैपासून उपोषणावर…

02-07-2024

पोल्ट्री व्यावसायिक ३ जुलैपासून उपोषणावर…

पोल्ट्री व्यावसायिक ३ जुलैपासून उपोषणावर…

राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक येत्या ३ जुलै पासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण पुणे येथील राज्याचे पशु संवर्धन आयुक्त यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी दिली.

राज्यातील सुमारे दहा लाख पोल्ट्री व्यावसायिक यांनी या उपोषणाला सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ते हे आंदोलन करत आहेत. राज्याचे पशु संवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कार्यालयावर हे उपोषण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर आणि सचिव विलास साळवी व कार्याध्यक्ष शरद गोडांबे, नंदू चौधरी, सर्जेराव भोसले, एकनाथ गाडे, सुभाष केदारी यांनी हे नियोजन केले आहे.

राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या उपोषणाला बसणार आहेत. मावळ तालुक्यातून या उपोषणासाठी गाडे यांच्यासह, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रवीण शिंदे, महेश कुडले, उत्तम शिंदे, संभाजी शिंदे, विनायक बदले प्रयत्न करीत आहेत.

वीज बिल माफ करावे:

पोल्ट्री योजना संघटनेच्या वतीने सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी लागू केलेली गाइडलाइन महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी. ग्रामपंचायतीच्या वतीने आकारलेली अवास्तव घरपट्टी रद्द करावी. वीज बिल माफ करावे, इत्यादी मागण्या ह्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत, त्याची सोडवणूक होईपर्यंत हे उपोषण चालणार असल्याची माहिती  संघटनेने दिली आहे.

लाक्षणिक उपोषण, पोल्ट्री आंदोलन, पोल्ट्री व्यावसायिक, ३ जुलै उपोषण, प्रलंबित मागण्या, पुणे उपोषण, पोल्ट्री संघटना, महाराष्ट्र पोल्ट्री, पोल्ट्री, poltry on strik, kukutpalan

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading