पंजाब डख हवामान अंदाज, पावसाची पुढील वाटचाल कशी राहील?
22-06-2024
पंजाब डख हवामान अंदाज, पावसाची पुढील वाटचाल कशी राहील?
- राज्यामध्ये 22 जून पासून ते 30 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत जोरात पाऊस पडणार आहे.
- आज मध्यरात्रीत पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल
- राज्यात उद्यापासून म्हणजेच 22 जून पासून ते 30 जून पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या.
- राज्यामध्ये जवळपास 60 टक्के पेरणी झाली आहे आणि 40% लोकांची पेरणी बाकी आहेत,
- राज्यात मागील दोन-तीन दिवस पावसानं थोडी उघड दिली होती, काही भागात थोडाफार पाऊस चालू होता एकदम पाऊस थांबलेला नव्हता.
- पण 22 जून पासून ते 30 जून पर्यंत राज्यात दररोज भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे.
- 27 जून व 28 जूनला जास्त मोठा पाऊस पडणार आहे. तसे पहिले तर विदर्भातून आज मध्य रात्रीच पावसाला सुरुवात होईल म्हणजे पूर्व विदर्भातून सुरू होऊन पश्चिम विदर्भात पाऊस येईल आणि उद्या पश्चिम महाराष्ट्र कडे जाईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.