पंजाबराव डख यांचा आजचा हवामान अंदाज 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर…
25-07-2024
पंजाबराव डख यांचा आजचा हवामान अंदाज 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर…
राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पुर आल्याची स्थिति पाहायला मिळत आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे. त्यामध्ये पुढील काही दिवस राज्यामध्ये पावसाचे वातावरण असेच राहणार असल्याचे वर्तवले आहे.
राज्यामध्ये 2 ऑगस्टपर्यंत ढगाळ वातावरण राहील असे त्यांनी सांगितले आहे. त्याबरोबरच शेतकर्यांनी जसे वेळ मिळेल तसे शेतीचे कामे करून घ्या, फवारणी करताना योग्य औषधांचा वापर करावा.
राज्यात 25 जुलै पासून पुन्हा पावसाचा जोर टिकून राहणार आहे. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागात कमी अधिक प्रमाणात 2 ऑगस्टपर्यंत पाऊस हा कायम राहणार आहे. कोकण विभागात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले.