रब्बी हंगामासाठी बियाणे विक्री सुरू, जाणून घ्या कोणते वाण चांगले...

09-11-2024

रब्बी हंगामासाठी बियाणे विक्री सुरू, जाणून घ्या कोणते वाण चांगले...

रब्बी हंगामासाठी बियाणे विक्री सुरू, जाणून घ्या कोणते वाण चांगले...

गेल्या वर्षी उत्पादित केलेली बियाणे यंदाच्या रब्बी (२०२४-२५) हंगामात पेरणीसाठी ज्वारी, करडई, हरभरा व गहू, जवस इत्यादि पिकांची बियाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील विविध संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी बिज प्रक्रिया केंद्र, परभणीने रब्बी पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. यात ज्वारी, हरभरा, जवस, करडई, गहू या पिकांची विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे बियाणे उपलब्ध केली आहेत.

रब्बी हंगामासाठी ५ नोव्हेंबरपासून बिज प्रक्रिया केंद्र, व.ना.म.कृ.वि, परभणी येथे ही बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी विद्यापीठाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. ए. शिंदे यांनी केले आहे.

कोणती आहेत वाण:

  • ज्वारी पिकांत ४ प्रकारची वाण उपलब्ध आहेत. परभणी शक्तीचे ४ क्विंटल बियाणे, सुपर मोती ११ क्विंटल, परभणी मोती ४ क्विंटल, परभणी ज्योती ८० किलो (csv-18) असून त्याचा दर हा ५०० रुपये प्रति बॅग याप्रमाणे आहे.
  • हरभरा पिकाचे परभणी चना नं-१६ या वाणाचे १ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा १०० रुपये प्रति बॅग असा आहे.
  • जवस पिकाचे एलएसएल- ९३ या वाणाचे ४ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा अनुक्रमे ६५० आणि २६० याप्रमाणे आहे.
  • करडई पिकाचे पीबीएनएस ८३ या वाणाचे १० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा ५५० रुपये प्रति बॅग याप्रमाणे आहे.
  • गहू पिकाचे एनआयएडब्ल्यु- १४१५ या वाणाचे ७ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचा दर हा २ हजार रुपये प्रति बॅग याप्रमाणे आहे.

रब्बी बियाणे, ज्वारी वाण, करडई बियाणे, हरभरा बियाणे, गहू वाण, जवस बियाणे, बिज प्रक्रिया, शेतकरी, परभणी, कृषी विक्री, बियाणे दर, वाण विक्री, रब्बी हंगाम, कृषी महाविद्यालय, shetkari, beyane, beej prakriya, rabbi hangam

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading