ऑनलाइन नोंदणीद्वारे रब्बी बियाणे मिळविण्याची संधी...
23-10-2024
ऑनलाइन नोंदणीद्वारे रब्बी बियाणे मिळविण्याची संधी...
यंदा जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीचे नियोजन करता येणार आहे. शेतकऱ्यांना हे नियोजन करताना आर्थिक हातभार मिळणार असल्याची बातमी आहे. त्यासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
त्यासाठी ऑनलाइन स्वरूपात बियाण्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यामध्ये दोन लाख आठ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यादृष्टीने पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रारंभ करता यावा म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या कामामध्ये 'महाबीज'ने पुढाकार घेतला असून. पेरणीकरिता जिल्ह्याला पाच हजार ८३० क्विंटल हरभऱ्याच्या बियाण्याची उपलब्धता करून दिली जाणार आहे.
यामध्ये १० वर्षावरील बियाण्याच्या खरेदीसाठी किलोमागे १५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे तर १० वर्षांच्या आतील बियाण्यासाठी किलोमागे २० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
अशा स्वरूपाचे ५९० क्विंटल हरभऱ्याचे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच गव्हाचे बियाणेदेखील शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होणार आहे. दोन्ही बियाणे मिळविताना प्रथम त्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.
एका शेतकऱ्याला एक बॅग:
अनुदान स्वरूपातील बियाण्याचे वितरण करताना एका शेतकऱ्याला एक बॅग दिली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे.
यानंतरच या बियाण्याची बॅग शेतकऱ्यांना मिळणार आहे. ऑनलाइन वितरणानंतर उर्वरित बॅगा ऑफलाइन स्वरूपातील नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.