महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी…
16-07-2024
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी…
राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला असून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राहिलेल्या भागातही चांगला पाऊस पडताना दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
आज (दि. १६ जुलै) कोकणात मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा व कोल्हापूर या परिसरामध्येही मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.
या दरम्यान राहिलेल्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
कुठे आहेत अलर्ट ?
कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. तर कोकणातील उरलेल्या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट दिला आहे.
येलो अलर्ट :
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसहित संपूर्ण मराठवाडा व संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यांत जोरदार आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
कुठे पडणार मुसळधार पाऊस :
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार तर अतिजोरदार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.