पीक विमा व नुकसान भरपाईसाठी नोंदणी, १ ऑगस्ट पासून पोर्टल सुरू...

26-07-2024

पीक विमा व नुकसान भरपाईसाठी नोंदणी, १ ऑगस्ट पासून पोर्टल सुरू...

पीक विमा व नुकसान भरपाईसाठी नोंदणी, १ ऑगस्ट पासून पोर्टल सुरू...

विमा व नुकसान भरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे. ई-पाहणी अॅपमध्ये शेतकर्‍यांनी १ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी करायची आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. 

तसेच पीक पेरणी अहवालाची खरी माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने व पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. 

ई-पीक पाहणीद्वारा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहण्याची जलद वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे तलाठ्यांचे काम जलद व सोपे होणार आहे.

हंगामाची पीक पाहणी करा:

१ ऑगस्ट पासून पोर्टल सुरू होणार आहे तसेच शेतकरी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात. १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर अशा ४५ दिवस शेतकरी स्तरावरील पीक पाहणी होणार असून सहायक स्तरावरील पीक पाहणी १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असे ३० दिवस चालणार आहे.

खातेदार निहाय पीक पाहणी होणार:

खातेदार निहाय पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे व पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई इत्यादि शक्य होणार आहे.

अॅपवर नोंदणी कशी होणार?

  • ई-पीक पाहणी अॅप डाऊनलोड करून त्यावर घर बसल्या नोंदणी करता येते. 
  • ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येते.
  •  १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असे ४५ दिवस शेतकरी स्तरांची पीक पाहणी होणार आहे. 
  • सहायक स्तरावरील पीक पाहणी १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशी एकूण ३० दिवस चालणार आहे.

पीक नोंदणी, ई-पाहणी, पीक विमा, नुकसान भरपाई, कृषी विभाग, पीक पाहणी, खातेदार नोंदणी, पीक कर्ज, विमा, शेतकरी नोंदणी, हंगाम पाहणी, shetkari, शेतकरी, pik pahani

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading