कृषि तंत्रज्ञान सावंत यांचे भातशेती लागवड चारसूत्र

09-03-2024

 कृषि तंत्रज्ञान सावंत यांचे भातशेती लागवड चारसूत्र

कृषि तंत्रज्ञान सावंत यांचे भातशेती लागवड चारसूत्र   

चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्याचबरोबरीने चांगले उत्पादन हि  मिळते. संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे. लावणी पद्धतीसाठी ४० किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. संकरित जातींसाठी हेक्‍टरी  २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५  ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा थायरम बुरशीनाशक चोळावे. त्यानंतर २५०  ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व २५०  ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रति १०  किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन

अ) सेंद्रिय खतांची मात्रा -
हेक्‍टरी १० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.

ब) रासायनिक खतांची मात्रा -
हेक्‍टरी १००  किलो नत्र, ५०  किलो स्फुरद व ५०  किलो पालाश द्यावे. संकरित जातीकरिता हेक्‍टरी १२० किलो नत्र, 50किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. यापैकी लागणीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्के नत्र लागणीनंतर २५ ते 30 दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्के नत्र लागणीनंतर ५५  ते ६०  दिवसांनी द्यावे.

क) जैविक खतांची मात्रा - 
ऍझोला (चार ते पाच क्विंटल प्रति हेक्‍टर) चिखलणीच्यावेळी शेतात मिसळावे. निळे-हिरवे शैवाल प्रति हेक्‍टरी २० किलो लागणीनंतर आठ ते १०  दिवसांनी शेतात मिसळावे.

ड)रोपांना जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया -
लागवडीपूर्वी रोपे जिवाणू संवर्धकांच्या द्रावणात बुडवावीत. हे द्रावण तयार करण्यासाठी २५०  ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि २५०  ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १०  लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात रोपे २०  मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर पुनर्लागवड करावी
चारसूत्री लावणी तंत्रज्ञान.

सूत्र 1 -
भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी. पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी अंदाजे दोन टन भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा. त्यामुळे पालाश २० -२५  किलो आणि सिलिका १२०  किलो उपलब्ध होते. रोपे कणखर होऊन खोडकिडीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

सूत्र 2 -
प्रति गुंठा गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडाची 30 किलो पाने चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत. भात रोपांना सेंद्रिय नत्र हेक्‍टरी १०  ते १५ किलो उपलब्ध होते. तसेच उंदरांचा प्रादुर्भाव कमी होतो.

सूत्र 3-

 नियंत्रित लावणी -
नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर २५सें.मी. व १५  सें.मी. आलटून (-२५ -१५ -२५ -१५ -सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक दोन ते तीन रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने १५  सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर मार्गदर्शक वापरून 40 सें.मी. दोरी मागे सरकवावी. पुन्हा जोड-ओळ पद्धत (चार चूड) वापरून खाचरातील नियंत्रित लावणी पूर्ण करावी. खाचरात १५ x १५ सें.मी. चुडांचे चौकोन व 25 सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात. 
लावणी करताना प्रत्येक चुडात दोन ते तीन रोपे सरळ व उथळ (दोन ते चार सें.मी. खोलीवर) लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे.

सूत्र 4 -

युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर -
नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७  ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१०  सें.मी. खोल खोचावी. एक गुंठे क्षेत्रासाठी ६२५ ब्रिकेट (१.७५  कि.ग्रॅ.) लागतात.
पाणी व्यवस्थापन.

1) रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत एक ते दोन सें.मी. 
2) रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत दोन ते तीन सें.मी. 
3) अधिक फुटवे येण्याच्या अवस्थेत तीन ते पाच सें.मी. 
4) भात पोटरीच्या अवस्थेत पाच ते १० सें.मी. 
5) फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत १० सें.मी. 
6) कापणीपूर्वी १० दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा.

चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने रोपांची चांगली वाढ होते. पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्याचबरोबरीने चांगले उत्पादन हि मिळते. संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading