शेतीत डिजिटल क्रांती! आता मशीन ठरवेल किती पाणी आणि केव्हा द्यायचं…
05-07-2025

शेतीत डिजिटल क्रांती! आता मशीन ठरवेल किती पाणी आणि केव्हा द्यायचं…
शेतीमधील हवामान बदल आणि जमिनीच्या पोतातील घडामोडी यामुळे शेतकऱ्यांना आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कीड-रोगांची वाढ, नव्या प्रकारची कीटकसंख्या आणि घटलेलं उत्पादन यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी आता स्मार्ट अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी चा वापर झपाट्याने वाढत आहे.
ड्रीप ऑटोमेशन म्हणजे काय?
पारंपरिक ठिबक सिंचन पद्धतीला आता डिजिटल ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची जोड मिळाली आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतीतील पाण्याचा वापर अधिक नियोजनबद्ध आणि कार्यक्षम झाला आहे.
ड्रीप ऑटोमेशनचे फायदे:
योग्य वेळी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर
श्रम आणि वेळेची मोठी बचत
जास्त उत्पादन आणि दर्जेदार पीक
संपूर्ण प्रक्रिया आता स्मार्टफोन अॅप्सद्वारे नियंत्रित केली जाते. म्हणजेच, शेतकरी कुठेही असो – तो एका क्लिकवरून शेतीमध्ये पाणी देऊ शकतो.
हवामान सेन्सर आणि AI यांची जोड:
ड्रीप ऑटोमेशन सिस्टममध्ये हवामान बदल लक्षात घेणारे स्मार्ट वेदर सेंसर्स जोडले जातात. हे सेन्सर खालील बाबतीत माहिती गोळा करतात:
- जमिनीतील ओलावा
- तापमान आणि आर्द्रता
- कीड-रोगाचा धोका
- खतांची गरज आणि पाण्याचा शोषण दर
ही माहिती AI अल्गोरिदमद्वारे प्रोसेस केली जाते आणि शेतकऱ्याला सतत नोटिफिकेशन्सद्वारे अपडेट मिळतो.
AI शेतीमध्ये कसं काम करतं?
AI प्रणाली वेगवेगळ्या डिजिटल स्रोतांद्वारे डेटा गोळा करते. यात सॅटेलाईट इमेजेस, वेदर स्टेशन डेटा, आणि स्मार्ट सेन्सर्स चा समावेश असतो. यामुळे:
- पीक आरोग्याचं निरीक्षण सातत्याने केलं जातं
- खतांची अचूक मात्रा ठरते
- पाणी देण्याची वेळ योग्य ठरते
- उत्पादनात लक्षणीय वाढ होते
हे पण पहा: सोयाबीनची वाढ हवी जोमात.? मग डख यांचा सल्ला नक्की वाचा..!
सिन्नरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग:
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मोहू गावचे सुनील भिसे, जे एमएस्सी अॅग्रीकल्चर पदवीधर आहेत, त्यांनी आपल्या ८ एकर शेतात मिरची, पेरू आणि सोयाबीनसाठी ड्रीप ऑटोमेशन यंत्रणा बसवली आहे.
‘Phyllo’ नावाच्या अॅपच्या मदतीने त्यांनी केवळ ₹५०,००० खर्चून ही प्रणाली बसवली आहे. शेतातील प्रत्येक हालचाल आता ते मोबाईल अॅपमधून नियंत्रीत करतात, ज्यामध्ये पाणी देणं, थांबवणं, हवामानाचा अंदाज, आणि जमिनीतील ओलाव्याची माहिती समाविष्ट आहे.
राज्य सरकारची पुढाकार योजना – ₹५०० कोटींचा निधी:
२०२५-२६ च्या राज्य अर्थसंकल्पात आधुनिक शेतीसाठी सरकारने ₹५०० कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामध्ये ड्रीप ऑटोमेशन युनिट, वेदर सेंसिंग यंत्रणा, आणि AI-आधारित ॲप्स शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणार आहेत.
स्मार्ट शेती – भविष्यातली गरज:
सध्या केवळ २०% शेतीमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. मात्र, कृषी विभाग गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना AI बेस्ड शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत आहे. येत्या काही वर्षांत ड्रीप ऑटोमेशनसह AI आधारित शेती ही भारतातील आधुनिक शेतीचा कणा ठरेल, हे निश्चित आहे.