सोलापूर बाजारात डाळिंबाची मोठी आवक..

07-08-2025

सोलापूर बाजारात डाळिंबाची मोठी आवक..
शेअर करा

सोलापूर बाजारात डाळिंबाची मोठी आवक..

सोलापूरमधील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रोज ११ ते १२ हजार क्रेट डाळिंब विक्रीसाठी येत आहेत.


किलोमागे किती दर मिळतोय?

डाळिंबाचे दर गुणवत्तेनुसार ठरवले जात असून, शेतकऱ्यांना किमान २० रुपये ते कमाल ३०० रुपये प्रति किलो दर मिळतो.


आवक वाढण्यामागची कारणं:

  • डाळिंब विक्रीसाठी क्रेटऐवजी किलोवर दर ठरवण्याचा निर्णय.

  • बाजार समितीमध्ये विश्वसनीय वजन काटे आणि पारदर्शक बिल प्रणाली.

  • शेतकऱ्यांचा वाढता विश्वास.


कांदा आणि बेदाण्यालाही मोठा प्रतिसाद:

या बाजार समितीत कांदा व बेदाण्याच्या विक्रीलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समिती नवीन विक्रम गाठत आहे.


नेतृत्वामुळे यशस्वी वाटचाल:

या यशामागे सभापती दिलीपराव माने यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती चांगली कामगिरी करत आहे.

सोलापूर, डाळिंब, बाजार, भाव, मराठी, solapur, dalimb, bajar, bhav, pomegranates, market, rate, marathi

शेअर करा
Loading

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शॉप

Loading