सौर कृषि वाहिनी योजना, २७६ उपकेंद्रांचे प्रकल्प…

17-07-2024

सौर कृषि वाहिनी योजना, २७६ उपकेंद्रांचे प्रकल्प…

सौर कृषि वाहिनी योजना, २७६ उपकेंद्रांचे प्रकल्प…

पुणे विभागात शेतीला दिवसा व नियमित वीजपुरवठा करण्यासाठी १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. या पूर्वी ९०० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आदेश देण्यात आले होते.

त्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात २७६ उपकेंद्रांसाठी एकूण १ हजार ९९१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९८ उपकेंद्रांसाठी ८६७ मेगावॉटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेत (२.०) पुणे विभागातील ७१० उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी ५ हजार ९१५ मेगावॉट सौर वीज निर्मितीचे लक्ष्य असून, आतापर्यंत ७ हजार ६६९ एकर शासकीय जमिनीचे अधि ग्रहण करण्यात आले आहेत.

त्यामध्ये पहिल्या टप्प्यात २७६ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी १ हजार ९९१ मेगावॉट च्या क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील २७६ उपकेंद्रांच्या परिसरातील हजारो शेतकर्‍यांना शेतीसाठी दिवसा व नियमित वीजपुरवठा होणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना संबंधित ग्राम पंचायत आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

जिल्हाउपकेंद्रांची संख्यामेगावॉट
पुणे५४४२९
सातारा३९२०८
सांगली४१३१७
कोल्हापूर४४१७०
सोलापूर९८८६७
एकूण२७६१९९१

प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. विशेष तर, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, तो प्रकल्प २५ वर्षे चालवणे व देखभाल आणि दुरुस्ती करणे यांद्वारे राज्याच्या ग्रामीण भागात अंदाजे ६ हजार पूर्ण वेळ, तर १३ हजार अर्धवेळ असे रोजगार निर्माण होतील. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील, अशा ग्रामपंचायतींना अंदाजे २०० कोटींहून अधिक अनुदान मिळणार आहे.

सौर ऊर्जा, पुणे विभाग, शेती वीज, सौर प्रकल्प, ऊर्जा निर्मिती, सौर कृषि, रोजगार संधी, शासकीय जमीन, ऊर्जा अनुदान, महावितरण योजना, ग्रामीण विकास, mahavitarn, vij yojna, solar power, solar power project, lite

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading