आजचा कृषी सल्ला : सौर प्रकाश सापळा
02-04-2024
आजचा कृषी सल्ला : सौर प्रकाश सापळा
- किडींच्या पतंगांना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते. प्रकाश बघितल्यावर किडीचे पतंग त्याकडे आकर्षिले जातात, हीच गोष्ट लक्षात घेऊन सौर प्रकाश सापळा विकसित करण्यात आला आहे.
- हा सापळा पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालतो. यासाठी संयंत्रातील बॅटरी ही सोलर फोटोव्होल्टाइन पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते, त्यामुळे विजेची बचत होते.
- सापळ्यामधून निघणारा विशिष्ट प्रकाश हा किडींना आकर्षित करून घेतो. सापळ्याखाली असलेल्या कीटकनाशकात पतंग पडून मरतात, यामुळे किडीची पुढची पिढी तयार होण्यास अडथळा येतो.
- सापळ्यामध्ये सोलर फोटोव्होल्टाइन पॅनेल, चार्ज कंट्रोलर आणि पॅनेलद्वारे उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी लीड ॲसिड बॅटरी वापरण्यात आली आहे.
- सापळ्याची उंची ही पिकाच्या उंचीपेक्षा १ ते २ फूट उंच असावी लागते. हे लक्षात घेऊन सापळ्यामध्ये उंची कमी- जास्त करण्याची सोय आहे.
- सापळा हा पूर्णतः स्वयंचलित असून सायंकाळी सुरू होतो आणि पाच तासांनी बंद होतो.
- बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा ही सौर प्रकाश सापळ्यामध्ये रात्रीच्या वेळी पाच तासांपर्यंत वापरली जाते. एक सापळा हा एक एकर क्षेत्रासाठी पुरेसा आहे.
- सापळ्याद्वारे यशस्वीरीत्या किडींवर नियंत्रण ठेवता येते.
- सापळ्यावर पाऊस, पाणी आणि हवा यांचा परिणाम होत नाही.
- धुके किंवा ढगाळ वातावरणात चार्जिंगकरिता इलेक्ट्रिक पोर्ट लावता येतो.
- सौर प्रकाश सापळ्याच्या वापरामुळे कीटकनाशकाच्या फवारणीत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
- हा सापळा वर्षानुवर्षे सतत चालतो, त्यामुळे दरवर्षी होणारा कीडनाशकांचा खर्च कमी होतो.
कृषिसल्लागार
कृषिरत्न डॉ सतीश भास्कर सोनवणे