या वर्षी संप्टेंबर मध्ये सोयाबीन ला काय भाव राहील?
07-09-2025

Soyabean Market September 2025 : या वर्षी संप्टेंबर मध्ये सोयाबीन ला काय भाव राहील?
Soyabean Price Today in India : सोयाबीन हे भारतातील प्रमुख तेलबिया पीक असून त्याच्या किमतींमध्ये वर्षानुवर्षे चढ-उतार दिसून येतात. चालू वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये सोयाबीनच्या दरांबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.
मागील तीन वर्षातील सप्टेंबर महिन्यातील दर
- सप्टेंबर २०२२ : ₹५,२५८ प्रति क्विंटल
- सप्टेंबर २०२३ : ₹४,८६० प्रति क्विंटल
- सप्टेंबर २०२४ : ₹४,६४४ प्रति क्विंटल
वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते की दरात सतत घट होत आहे.
सप्टेंबर २०२५ मधील संभाव्य दर
लातूर बाजार समितीतील अंदाजानुसार, चालू महिन्यात ₹४,५१५ ते ₹४,८९५ प्रति क्विंटल दरम्यान सोयाबीनचे भाव राहण्याची शक्यता आहे.
सोयामील निर्यात
- सन २०२३-२४ मध्ये भारतातून १९.७ लाख टन सोयामील निर्यात झाले.
- तर २०२४-२५ मध्ये ही संख्या कमी होऊन १८.० लाख टन वर आली.
निर्यातीत झालेली घट ही भावावर नकारात्मक परिणाम करणारी ठरली आहे.
उत्पादन स्थिती – भारत
- सन २०२५-२६ मध्ये भारतात १२५ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
- हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १% कमी आहे.
उत्पादन स्थिती – जागतिक
- USDA (ऑगस्ट २०२५) च्या अहवालानुसार, जगभरात सन २०२५-२६ मध्ये ४२७ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल.
- हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत ०.९% वाढलेले आहे.
आयात आणि सोयाबीन तेल
सोयाबीन तेलाच्या आयातीत सन २०२४-२५ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ५४% वाढ झाल्याचे दिसते.
सप्टेंबर २०२५ मध्ये सोयाबीनचे भाव मागील वर्षांच्या तुलनेत कमीच राहण्याची शक्यता आहे. निर्यातीत झालेली घट, आयातीत झालेली वाढ आणि जागतिक उत्पादनाचा दबाव यामुळे दरावर दबाव राहील. मात्र किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ₹५,३२८ प्रति क्विंटल निश्चित असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काही प्रमाणात आधार मिळू शकतो.