फळमाशीचा प्रादुर्भाव थांबवायचा का? सीताफळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपाय..!

12-11-2024

फळमाशीचा प्रादुर्भाव थांबवायचा का? सीताफळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपाय..!

फळमाशीचा प्रादुर्भाव थांबवायचा का? सीताफळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपाय..!

फळमाशी ही जागतिक स्तरावरील खूप महत्त्वाची व गंभीर कीड असून, जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यामधील अनेक सीताफळ उत्पादक शेतकरी या किडीने त्रस्त झाले आहेत. या फळमाशीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सीताफळ फळमाशी किडींचे तत्काळ नियंत्रण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकार्‍यांनी केंधळी येथे पाहणीदरम्यान केले आहे. तालुका कृषी अधिकारी वाघमोडे म्हणाले की, सीताफळ फळमाशी आणि किडींचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रक्षक सापळे लावावेत.

या सापळ्यामध्ये एक कुपी आहे. त्यामध्ये मिथाईल युजेनॉल लावून कापसाचा बोळा ठेवतात. त्यामुळे मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्या सापळ्यामध्ये आकर्षित होतात आणि आतमधील पाण्यात बुडून मरतात. 

शेतकऱ्यांनी पिकांच्या उंचीप्रमाणे हेक्टरी २० ते २५ सापळे झाडावर टांगून किंवा चार ते पाच फुटांवर ठेवावे. १८ ते २० दिवसांनी पुन्हा मिथाईल युजेनॉल कापसाचा बोळा बदलावा.

सापळ्यातील मेलेल्या माश्या काढून टाकून हे सापळे स्वच्छ करून ठेवावेत. फळमाशी या किडीसाठी मिथाइल युजेनॉल हे रसायन असलेल्या पिवळ्या बाऊल सापळ्याचा वापर उपयोगी ठरतो. साध्या प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये हे रसायन ठेऊनही सापळे तयार करता येतात.

त्याप्रमाणे परिपक्व झालेली फळे गळून बागेत पडतात. त्यामुळे फळमाशीची उत्पत्ती वाढते. ते टाळण्यासाठी बाग स्वच्छ करावी. फळमाशीची कोषावस्था जमिनीत असते. मातीत ती केवळ दोन-तीन सेंटीमीटरच खोल जाते. त्यामुळे माती हलवून घ्यावी.

शेतकऱ्यांनी रासायनिक कीड नियंत्रणाकडे वळावे:

  • एकात्मिक कीड नियंत्रण हा फळमाशीवरील महत्त्वाचा उपाय असून, तो सामूहिक स्तरावर केल्यास त्याचा प्रभाव दिसून येतो. बागेची स्वच्छता सापळे हे कमी खर्चिक उपाय आहेत.
  • गरज असेल तरच शेतकऱ्यांनी रासायनिक कीड नियंत्रणाकडे वळावे. असे जिल्हा कृषी अधिकारी जी. आर. कापसे, आर. ए. रोडगे यांनी सांगितले आहे.

फळमाशी नियंत्रण, कीड प्रतिबंध, सीताफळ शेती, कृषी मार्गदर्शन, सापळे, सेंद्रिय उपाय, पीक संरक्षण, मिथाईल युजेनॉल, शेतकरी, बाग स्वच्छता, shetkari, pik niyantran, saple, chikat saple, falmashi saple, फलमाशी सापळे, mithail, kid,trap

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading