कपाशी शेतकऱ्यांनो सावध! आकस्मिक मरामुळे उत्पादन धोक्यात

31-07-2025

कपाशी शेतकऱ्यांनो सावध! आकस्मिक मरामुळे उत्पादन धोक्यात
शेअर करा

मराठवाड्यात कपाशीच्या झाडांना अचानक सुकण्याची समस्या

मराठवाडा भागात पावसाच्या मोठ्या खंडानंतर पाऊस पडल्यामुळे कपाशीची झाडे अचानक सुकायला लागली आहेत. ही समस्या "आकस्मिक मर" म्हणून ओळखली जाते.


आकस्मिक मर का होते?

जेव्हा बराच काळ पाऊस पडत नाही आणि अचानक पाऊस पडतो किंवा सिंचन दिलं जातं, तेव्हा झाडाला जोराचा धक्का बसतो. त्यामुळे:

  • झाड सुकते

  • पाने गळतात

  • झाड हळूहळू मरते

  • उत्पादनात मोठं नुकसान होतं

या लक्षणे पाऊस किंवा सिंचनानंतर ३६ ते ४८ तासांत दिसू लागतात.


काय करावे? (उपाय)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तज्ञ यांचे सल्ले:

  1. शेतात पाणी साचले असेल तर लगेच निचरा करा. माती थोडी वाळल्यानंतर कोळपणी व खुरपणी करा.

  2. खालील दोनपैकी एक उपाय करा:

    • पहिला उपाय:
      २०० ग्रॅम युरिया

      • १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५०)

      • २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड
        हे १० लिटर पाण्यात मिसळा
        आणि झाडाच्या मुळाजवळ १०० मिली द्रावण टाका.

    • दुसरा उपाय:
      १ किलो १३:००:४५ खत

      • २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड

      • २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड
        हे २०० लिटर पाण्यात मिसळा
        आणि प्रत्येक झाडाजवळ १०० मिली द्रावण टाका.

  3. द्रावण टाकल्यानंतर झाडाजवळची माती पायाने दाबा.

  4. झाडं सुकायला लागली की लगेच, म्हणजे २४ ते ४८ तासांत हे उपाय करा. उशीर केल्यास नुकसान जास्त होऊ शकते.


थोडक्यात: झाडांना आकस्मिक मर टाळायची असेल, तर पावसाच्या किंवा सिंचनानंतर लगेच योग्य काळजी घ्या आणि वर दिलेले उपाय तातडीने करा.

कापूस, कपाशी, मराठवाडा, पाऊस, आकस्मिक मर, उपाय

शेअर करा
Loading

संबंधित शेती विषयक माहिती

Loading

शॉप

Loading