उन्हाळी हंगामात पिकांची घ्यायची काळजी
28-01-2023
उन्हाळी हंगामात पिकांची घ्यायची काळजी
उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उष्ण हवा, कोरडे हवामान, आणि सोसाट्याचा वारा यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होते. त्यामुळे जमिनीतली ओल इतर हंगामापेक्षा उन्हाळ्यात लवकर कमी होते.
त्यामुळे पाणी लवकर द्यावे लागते, पाळ्याही जास्त द्याव्या लागतात. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा अवघड स्थितीत पिकांना पाणी देताना फारच काळजी घ्यावी लागते.
काटकसरीने पाणी वापरण्यासंबंधी काळजी घ्यावी लागते.
- मध्यम ते भारी जमिनीची जलधारा शक्ती जास्त असल्याने अशा जमिनीत उन्हाळी पीके घ्यावीत.
- पाण्याची उपलब्धता पाहूनच कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागण करावी. पाण्याचा अपव्यय टाळावा. पाट स्वच्छ ठेवावेत. रान बांधणी सहजपणे पाणी बसेल अशा पद्धतीने करावी.
- उन्हाळ्यात पिकांच्या शिफारशीप्रमाणे योग्य जात, रोपांची संख्या, योग्य खतमात्रा, कीड-रोग नियंत्रण, तणांचा बंदोबस्त याकडे खास लक्ष्य देणे आवश्यक आहे.
- पिकाला क्षेत्राच्या सर्व क्षेत्रावर सम-प्रमाणात पाणी बसवण्यासाठी योग्य रानबांधणी करावी, भुईमुग, मुग, घासासारख्या, पिकांना थोडा ढाळ असलेले ३ मीटर रुंदीचे आणि २५ ते ३० मीटर लांबीचे सारे करून पाणी द्यावे.
- बाष्पीभवनाची क्रिया कमी करण्यासाठी सेंद्रिय मटेरियल उष्टावळ, पालापाचोळा, निकृष्ठ गवत, पाचट-वेगवेगळा खाण्याअयोग्य भुसा-भुसकट, प्लास्टिक कागद यांचे पिकामध्ये आच्छादन करावे. आच्चादानामुळे ३०-४० % पाण्याची गरज कमी होते.
- बाष्पीभवनाची क्रिया कमी करण्यासाठी पॉलिथिन कागसाद वापरणे सोईचे आणि फायद्यासाचे ठरते.
महत्वाचे –
उन्हाळी हंगामात कोणती पिके घ्यायची, त्यांची लागवड पद्धती काय आहे, कोणते वाण निवडावे, पिकासाठी जमीन कश्या प्रकारची असावी, कोणत्या पिकासाठी कश्याप्रकारे जमिनीची मशागत करायची, कोणत्या पिकासाठी कोणते हवामान योग्य, पेरणीची योग्य वेळ, एकरी बियाण्याचे प्रमाण, बियाण्यावरील प्रक्रिया, खतव्यवस्थापन, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन यासंबंधी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना krushikranti.com या वेबसाईट वर मिळेल.
आपल्या हक्काच्या कृषिक्रांती वेबसाईट वर सर्व शेती विषयक माहिती उपलब्ध आहे, लाखो शेतकरी याचा फायदा घेत आहेत तुम्हालाही नक्कीच याचा फायदा होईल.
source : Vikaspedia