Bajarbhav : सध्या बाजारात भावामध्ये चढ-उतार सुरूच
08-12-2023
Bajarbhav : सध्या बाजारात भावामध्ये चढ-उतार सुरूच
येत्या काही दिवसांत बाजारात टोमॅटोची आवक कमी होईल, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. कालच्या तुलनेत आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायदा दरात चांगली वाढ झाली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा 13.14 डॉलर प्रति बुशेल होता. सोयाबीनचा वायदा 408 डॉलरवर स्थिर होता. देशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची किंमत 4,600 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान होती. दर कमी झाल्यामुळे बाजारात सोयाबीनचे आवकही कमी झाले आहे. सोयाबीन बाजारातील विश्लेषकांनी सांगितले की, सोयाबीनच्या किंमतीतील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते.
कापसाच्या दरात आज चांगली सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदा 82.73 सेंट प्रतिपाऊंडवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत यात 3% वाढ झाली आहे. त्याच वेळी, देशांतर्गत बाजारात कालच्या तुलनेत वायदे खंडीमागे ६०० रुपयांनी वाढले होते. आज देशातील वायदे 57,600 रुपयांवर पोचले. बाजार समित्यांमधील भावही क्विंटलमागं 50 ते 100 रुपयांनी वाढले आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाची किंमत 6,600 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होती. त्याच वेळी, रेनटचची किंमत (भिजवलेला कापूस) 6 हजार ते 6,700 रुपयांच्या दरम्यान होता. कापूस बाजारातील तज्ज्ञांनी पुढील आठवड्यात कापूस दरात प्रति क्विंटल 100 रुपयांनी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
टोमॅटोच्या भावाला मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचे दिसते. बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे बाजारपेठेत आवकही वाढली आहे. त्यामुळे भावावर काहीसा दबाव आला होता. सध्या बाजारात टोमॅटोला गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. काही बाजारपेठांमध्ये टोमॅटोची किंमत 1000 रुपयांपासून सुरू झाली आहे. सरासरी किंमत 2 हजार ते 2500 रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत बाजारात टोमॅटोची आवक कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात गव्हाचे दर प्रति क्विंटलमागं 100 रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. भाव सुधारणेला लागवडीच्या आकडेवारीचाही आधार मिळत होता. गेल्या आठवड्यातील उत्पादन 9% कमी आहे. परंतु आजच्या अहवालात सरकारने हे स्पष्ट केले आहे की गेल्या वर्षीच्या लागवडीपेक्षा लागवडीचे प्रमाण काहीसे जास्त आहे. पण आवक कमी आहे. त्यामुळे गव्हाची सरासरी किंमत 2,800 ते 3,300 रुपयांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षीच्या पेरणीच्या तुलनेत गव्हाच्या पेरणीत आतापर्यंत काही प्रमाणात प्रगती झाली असली तरी अंतिम पेरणी किती केली जाते आणि भविष्यात पिकाचे हवामान कसे असेल यावर उत्पादन अवलंबून असेल. गव्हाच्या किंमतीत सुधारणा सुरूच राहील अशी अपेक्षा आहे.
देशात ज्वारीच्या दरात वाढ होत आहे. आता पावसाने नुकसान झाल्यामुळे उत्पादनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. बाजारात सध्या ज्वारीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणं भाव मिळतोय. मालदांडी ज्वारीचे भाव सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांपर्यंत पोहोचली. हायब्राडी ज्वारीचा भाव 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान आहे. पांढऱ्या आणि दादर ज्वारीचा दर 4 हजार ते 4 हजार 500 रुपयांच्या दरम्यान दिसते. बाजार आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे व्यापारी आणि अभ्यासक असा अंदाज वर्तवत आहेत की ज्वारीच्या किंमतीतील वाढ कायम राहू शकते.