दुग्ध अनुदानासाठी ३० रुपये दराची अट…

11-07-2024

दुग्ध अनुदानासाठी ३० रुपये दराची अट…

दुग्ध अनुदानासाठी ३० रुपये दराची अट…

दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर किमान ३० रुपये दर देणाऱ्यांनाच प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यावर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील टिकून आहेत. गाय दूध अनुदानाबाबत बुधवारी मंत्रालयात राज्यातील सहकारी, खासगी दूध संघांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनांची बैठक झाली.

या बैठकीमध्ये राज्यातील खासगी दूध संघांनी ३० ऐवजी २८ रुपये ५० पैशांपर्यंत अट थांबवण्याची मागणी लावून धरली होती. पाच रुपये अनुदान हवे असेल तर उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. साठी किमान ३० रुपये दर देणे गरजेचे आहे.

पण, दूध संघांना ते परवडत नसल्याचे दूध संघांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले पण, ते अमान्य करत उत्पादकांना प्रतिलिटर ३० रुपये दिलेच पाहिजेत, यावर दुग्ध विकास मंत्री विखे-पाटील टिकून राहिले. त्यामुळे जे दूध उत्पादक एवढा दर देणार नाही, त्यांना अनुदान मिळणार नाही.

तसेच अतिरिक्त दुधाची पावडर केली जाते, त्याला सुद्धा दर नसल्याचे संघ प्रतिनिधींनी सांगितले. या बाबतीत, प्रतिलिटर दीड रुपये रूपांतरण खर्च देता येईल का या विषयी चर्चा करून निर्णय घेऊ, असे स्पष्टीकरण मंत्री विखे-पाटील यांनी दिले. 

दूध अनुदान योजना केवळ तीन महिन्यांसाठी न राबवता पुढे सुरू ठेवण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

राज्य शासनाने गाय दुधासाठी किमान दराबाबतचा अध्यादेश काढत 'गोकुळ' ने कार्यक्षेत्राबाहेरील दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बैठकीत शेतकरी संघटनेच्या वतीने गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे खूप खूप अभिनंदन केले.

अनुदानासाठी दुग्ध विभागाला सूचना:

अनुदानापासून वंचित राहिलेल्या दूध उत्पादकांची जिल्हा नुसार आकडेवारी मंत्री विखे पाटील यांनी वाचून दाखवत सर्व दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत दुग्धविकास विभागास सूचना दिल्या. 

कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसहा हजार दूध उत्पादक मागील अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत असे निदर्शनास आले.

दुग्ध अनुदान, दूध दर, शेतकरी बैठक, अनुदान अट, दुग्ध उत्पादक, अनुदान निर्णय, गाय दूध, दुग्ध मंत्री, दूध संघ, शेतकरी संघ, पाच रुपये, doodh anudan, shetkari anudaan, anudaan

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading