Bajarbhav : सोयाबीन आणि कापसाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे.
05-12-2023
Bajarbhav : सोयाबीनचा वायदा गेल्या 15 महिन्यातील सर्वात खालच्या पातळीवर
Bajarbhav : सोयाबीन आणि कापसाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे.
सोयाबीनचे वायदे गेल्या सव्वा महिन्यातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. सोयाबीनचा भाव आज 13.11 डॉलर प्रतिबुशेल्सवर होता. सोयाबीन वायदा देखील आज 410 प्रतिबुशेल्सवर दीड महिन्याच्या नीचांकी पातळीवर घसरला. देशातील बाजारपेठही नरम आहे आणि सोयाबीनला आज बाजारात सरासरी किंमत 4,600 ते 4,900 रुपये मिळाली आहे. ब्राझीलमधील बदलत्या परिस्थितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि देशांतर्गत सोयाबीन बाजारपेठ बदलत आहे. ही दरवाढ आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे.
कापसाच्या भावातही चढ उतार सुरु आहेत. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे 78.66 सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील एमसीएक्सवरील वायदे ७८० रुपयांनी खंडीमागे नरमले होते. बाजार समित्यांमधील सरासरी किंमत पातळी 6,600 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होती. बाजारात कापसाची आवक सरासरी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, कापसाचे दरही कमी आहेत. याची किंमत 6 हजार रुपयांपासून सुरू होते. कापूस भावावरील दबाव आणखी काही दिवस चालू राहू शकतो.
देशातील महत्वाच्या गहू बाजारात सध्या दरात काहीसे चढ उतार दिसत आहे. पण आठवड्याचा विचार केला तर गव्हाच्या भावात सुधारणा झाली. गव्हाची आवक कमी होत आहे. तर गव्हाला उठाव कायम आहे. मागणीच्या तुलनेत बाजारातील आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत आहे. गव्हाचे भाव मागील आठवडाभरात क्विंटलमागं ५० ते ७० रुपयांनी वाढले. तर ग्राहक बाजारातील वाढ जास्त होती. तसेच रब्बीतील गव्हाची लागवड गेल्यावर्षीपेक्षा अजूनही पिछाडीवर आहे. याचा परिणाम थेट गव्हाच्या बाजारावर दिसून येत आहे. गव्हाचा भाव सरासरी २ हजार ८०० ते ३ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. गव्हाच्या दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
देशात तूर, हरभरा, मूग आणि उडदाचे भाव तेजीत असतान मसूर मात्र दबावात आहे. मसूर स्वस्त असल्याने सरासरीच्या तुलनेत मसूरचा वापर वाढलेला दिसतो. पण आयातही मोठ्या प्रमाणात वाढ आहे. आयात झालेला माल बंदरांवर उपलब्ध आहे. परिणामी मसूरच्या भावावरही दबाव आहे. मसूरचा भाव ५ हजार ८०० ते ६ हजार ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुरीला मसूर काही प्रमाणात पर्याय असतो. त्यामुळे मसूरला उठाव आहे. हा उठाव लक्षात घेता सरकारने आयात वाढवली. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा पुरेसा आहे. त्यामुळे मसूरचे भाव पुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून केळीचे भाव नरमलेले दिसतात. आंध्र प्रदेशातून पिलबागसह इतर भागांमधून केळीची आवक सुरू झाली आहे. ही आवक मागील आठ ते १० दिवसांमध्ये चांगलीच वाढली. यामुळे राज्याच्या केळीला स्पर्धा निर्माण झाली. याचा दरांवर परिणाम झाला आहे. १० दिवसांपूर्वी केळीचे कमाल दर २ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल होते. पण आता कमाल दर १ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. केळी दरात मागील काही दिवसांत घट झाली असून १ हजार २०० ते १ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर सध्या मिळत आहे. प्रतिकूल वातावरण आणि कमी उठाव यामुळे दरात घट झाल्याची माहिती आहे. केळी दरावरील हा दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज आहे.