Havaman : आजचा तातडीचा हवामान अंदाज - 18 सप्टेंबर 2023
18-09-2023
Havaman : कोकनासह घाटमाथ्याच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता
havaman andaj : राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १८) कोकनासह घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
राज्यात ढगाळ हवामान झाले असून, काळ (ता. १७) सकाळपर्यंत घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली.
आज उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित कोकणासह नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Rain update : कमी दाब क्षेत्र निवळते आहे
ठळक कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे, आग्नेय राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम तशीच आहे. ही प्रणाली पुढील दोन दिवसांत नैऋत्य राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे.
Yellow alert : जोरदार पावसाचा येलो अलर्ट :
पालघर.
Heavy rain : तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता :
नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे.
अशाप्रकारे हवामान अंदाज, शेतीविषयक महत्त्वाची माहिती तसेच दररोजचे ताजे बाजारभाव आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी 8378955712 या व्हाट्सअँप नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.
source : agrowon