IMD Alert : पुढील दोन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट
25-11-2023
IMD Alert : पुढील दोन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट
IMD Alert : हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणही राहील, असा अंदाज आहे.
हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना वारे, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव तसेच खानदेशातील नंदूरबार आणि धुळे तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. उद्याही राज्यातील बहुतांशी भागात काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टही देण्यात आला.