Bajarbhav : आजचे बाजारभाव अपडेट - 15 सप्टेंबर 2023
15-09-2023
Bajarbhav : आजचे बाजारभाव अपडेट - 15 सप्टेंबर 2023
Bajarbhav : आले बाजारात तेजीत, तर टोमॅटोला मंदीची मार
कापूस बाजारभाव : Kapus bajarbhav
देशातील बाजारात कापसाच्या भावात आज काहीशी नरमाई राहिली. वायद्यांमध्ये कापसाचा भाव ३२० रुपयांनी कमी होऊन ६० हजार ६०० रुपयांवर आला. तसेच बाजार समित्यांमधील भाव प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान राहीले. उत्तर भारतातील बाजारात नव्या कापसाची आवक चालू आहे. पण सध्याच्या काळात आवकेचे प्रमाण कमी आहे. यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याची शक्यता असल्याने भाव चांगले राहण्याचा अंदाज असल्याचे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
सोयाबीन बाजारभाव : Soyabean bajarbhav
मागील काही महिन्यांपासून देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सध्या सोयाबीनला बाजारात ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारात सध्या मंदी आहे. कमी पावसाचा फटका यंदा सोयाबीन पिकाला बसत आहे. त्यामुळे उत्पादनात यंदा घट होईल, असा अंदाज आहे. पण मागील हंगामातील साठा शिल्लक असल्याने फार मोठी तेजी सध्यातरी सोयाबीन दरात दिसत नाही, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
उडीद बाजारभाव : Udid bajarbhav
देशातील उडीद उत्पादन मागील हंगामात कमीच राहीले. तर यंदा लागवडही घटली आहे. देशातील कडधान्य लागवडीत उडीद पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक घटले. त्यामुळे खरिपातील उडदाचे उत्पादन कमीच राहणार आहे. तसेच उडदाचे भाव टिकून आहेत. सध्याच्या काळात उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ९ हजारांचा भाव मिळत आहे. आणखी काही दिवस उडदाचे भाव असेच टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
आले बाजारभाव : Ale bajarbhav
देशात सध्या आल्याचे भाव तेजीत आहेत. बाजारातली आल्याची आवक कमीच असल्याने दराला चांगला आधार मिळाला आहे. सध्या देशातील बाजारात आल्याला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे. पुढील आणखी काही दिवस आल्याची बाजारातील आवक वाढण्याची शक्यता कमीआहे. त्याच्यामुळे आल्याचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
टोमॅटो बाजारभाव : Tomato bajarbhav
सध्या टोमॅटोचे भाव कोसळल्याचे दिसून येत आहे. टोमॅटो विक्रीतून वाहतुकीचा खर्चही निघणं अवघड आहे. बाजारात केवळ एक रुपया प्रतिकिलोपासून टोमॅटोचा भाव सुरु होतो. तर सरासरी ५ रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. हा भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. टोमॅटोला उत्पादन खर्च प्रतिकिलो १२ रुपयांपर्यंत येतो. तर विक्रीला बाजारात नेण्यासाठी किलोमागे दोन ते तीन रुपयांचा खर्च सुद्धा त्यामध्ये आला. आता बाजारात मिळणाऱ्या भावातून केवळ वाहतुक खर्च कसाबसा निघतो. तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या मते भाव पडण्यामागे सरकारचे धोरण जबाबदार…
सध्या टोमॅटोचे भाव पडण्यामागे सरकारचे धोरणही जबाबदार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. टोमॅटो महाग झाला होता तेव्हा सरकारने नेपाळमधून आयात केले आणि भाव पाडले होते. सध्या टोमॅटोचे भाव उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. पण सरकार या काळात सुद्धा शेतकऱ्यांना आधार देत नाही. तसेच यंदा दुष्काळी स्थिती दिसत आहे. त्यामुळे टोमॅटोचा पुढील हंगाम घेता येईल का याबाबत शंका आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे अर्थकारण कोलमडण्याची शक्यता आहे. सरकारने या काळात शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत
*असेच रोजचे बाजारभाव उपडेट आपल्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी 8378955712 या नंबर वर तुमच्या जिल्ह्याचे नाव पाठवा.
source : agrowon