IMD alert : आज राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
07-09-2023
![IMD alert : आज राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1694083356164.webp&w=3840&q=75)
IMD alert : आज राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
IMD alert : आज सकाळपासून राज्याच्या काही भागात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. पण सर्वदूर जोरदार पाऊस नाही. यामुळे शेतकऱ्यांना चिंता कायम आहे. आज संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नगर तर सिंधुदुर्ग वगळता कोकणात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. या भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
तर उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
Weather update : मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
याशिवाय राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
source : agrowon