Rain Update : आजही राज्यातील बहुतांश भागात पाऊस…
10-01-2024
Rain Update : आजही राज्यातील बहुतांश भागात पाऊस…
उद्या कसे राहील हवामान?
- हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
- राज्याच्या काही भागात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढली. हवामान मुख्यतः ढगाळ होते. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
- मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, नेवासा, वेल्हे आणि नगर येथे हलका पाऊस झाला.
- मराठवाडा येथील छत्रपती संभाजीनगर येथेही मुसळधार पाऊस झाला. मात्र, काही भागात तुरळक पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
- भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
- उर्वरित ईशान्य भारत, उत्तराखंडचा काही भाग, बिहारचे उत्तरेकडील जिल्हे, पश्चिम बंगाल, विदर्भातील काही भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, गुजरात प्रदेश, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.