१७, १८, १९ आणि २० मार्च दरम्यान पूर्व विदर्भात गारपीठ तर पश्चिम विदर्भात तुरळक पाऊस
14-03-2024
१७, १८, १९ आणि २० मार्च दरम्यान पूर्व विदर्भात गारपीठ तर पश्चिम विदर्भात तुरळक पाऊस
पंजाब डख साहेबांचा आजचा लेटेस्ट ताजा हवामान अंदाज जाहीर झाला आहे. या हवामान अंदाजात येत्या काही दिवसात नेमका कोणत्या भागात आणि किती पाऊस पडेल हे आपण जाणून घेणार आहोत.
आजचा हवामान अंदाज मुख्यतः पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी देत आहे, कारण पूर्व विदर्भात सध्या हरभरा, तूर, भात काढणी देखील चालू आहे, त्यामुळे हा खास अंदाज देण्यात येत आहे.
पूर्व विदर्भामध्ये १७, १८, १९, २० मार्चला गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये गारपीट देखील होणार आहे, त्यामुळॆ आपण आपल्या पिकाची आपल्या धान्याची काळजी घ्यावी.
त्यानंतर हा पाऊस पूर्व विदर्भाकडून पश्चिम विदर्भाकडे जाणार आहे, यादरम्यान यवतमाळ, नांदेड या भागात तसेच हिंगोलीच्या काही भागात हा पाऊस येणार आहे, त्यानंतर अमरावती, अकोट, अचलपूर ते अकोल्यापर्यंत पाऊस येणार आहे. पश्चिम विदर्भामध्ये त्याप्रमाणात थोडा पाऊस येणार आहे, त्यानंतर आपण जसजसे अकोल्याकडे जाऊ तसतसे पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे, हा पाऊस याप्रकारे जसजसा पूर्वेकडे जाईल तशी पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे. आणि अमरावती वर्धा या भागात गारपीट होणार आहे.
गारपिटीचा अंदाज पहिला तर अमरावती, वर्धा, चंद्रपूरचा पूर्वेकडील भाग, तसेच छत्तीसगड राज्यामध्ये तर जोरदार गारपीट होणार आहे. मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच कोकणपट्टी या भागात ढगाळ वातावरण राहील.
एकंदरीत १७, १८, १९, २० मार्चला पूर्व विदर्भात जास्त पाऊस आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. त्यानंतर २१ मार्चनंतर राज्यात कडक उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. यानंतर हवामानात काही बदल झाला तर पुन्हा एकदा तुम्हाला अंदाज दिला जाईल.
पंजाब डख लाईव्ह हवामान अंदाज यू-ट्यूबला पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
पंजाब डख लाईव्ह हवामान अपडेट मिळवण्यासाठी कृषी क्रांती अँप डाऊनलोड करा👉कृषी क्रांती अँप