Weather Updates: आजचा हवामान अंदाज! राज्यात पुन्हा पावसाची शक्यता…
02-01-2024
Weather Updates: आजचा हवामान अंदाज! राज्यात पुन्हा पावसाची शक्यता…
राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भाच्या पूर्व भागात थंडीची लाट कायम राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दिवसा तापमान वाढते आणि रात्री कमी होते. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्याच वेळी, हवामान बदलामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. जर तापमान वाढले तर लोकांना उष्णतेचा फटका सहन करावा लागेल.
🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇