या 6 सरकारी योजना देणार शेतकऱ्यांना लाखोंचं अनुदान!!! कोणत्या आहेत या योजना जाणून घ्या
11-08-2025

6 महत्वाच्या सरकारी योजना सोप्या भाषेत
शेतकऱ्यांनो, सरकार तुमच्यासाठी अनेक योजना चालवते. पण योग्य माहिती नसल्यामुळे बरेच जण त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत. खाली 6 महत्वाच्या सरकारी योजना सोप्या भाषेत दिल्या आहेत.
या 6 सरकारी योजना देणार शेतकऱ्यांना लाखोंचं अनुदान!!! कोणत्या आहेत या योजना जाणून घ्या
1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN)
पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹6,000 मिळतात.
हे पैसे 3 हप्त्यांमध्ये थेट बँकेत जमा होतात.
नोंदणीसाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा कृषी कार्यालयात जा.
बँक खाते PM-KISAN पोर्टलवर अपडेट असणं आवश्यक.
2. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (pm kisan yojna)
18 ते 50 वयोगटातील लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी निवृत्तिवेतन योजना.
महिन्याला फक्त ₹55 ते ₹200 भरायचे.
वय 60 पूर्ण झाल्यावर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळते.
PM-KISAN मधून येणाऱ्या पैशातून हप्ता भरता येतो.
3. प्रधानमंत्री पीक विमा योजना (pik vima yojna)
पिकांचं नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळते.
शेतकऱ्यांकडून फक्त 2% ते 5% प्रीमियम घेतला जातो.
काही राज्यांत सरकार पूर्ण प्रीमियम भरते.
भरपाई थेट बँक खात्यात जमा होते.
4. किसान क्रेडिट कार्ड (KCC)
शेतीसाठी लागणाऱ्या तातडीच्या खर्चासाठी कर्ज सुविधा.
₹5 लाखांपर्यंतचं कर्ज फक्त 4% व्याजदराने.
बी-बियाणं, खतं, औजारं यासाठी वापरता येतं.
PM-KISAN घेणाऱ्यांना हे कार्ड सहज मिळतं.
5. प्रधानमंत्री कुसुम योजना
सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी मोठं अनुदान.
60% सरकार देते, 30% बँक कर्ज देते, आणि फक्त 10% शेतकऱ्याने भरायचं.
जास्त वीज तयार झाली तर वीज कंपनीला विकून पैसे कमवू शकता.
6. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)
ड्रिप व स्प्रिंकलर सिंचनासाठी अनुदान.
लहान व सीमांत शेतकऱ्यांना 55% अनुदान, इतरांना 45% अनुदान.
पैसे थेट बँक खात्यात येतात (DBT).
पाणी वाचतं आणि पिकांची उत्पादकता वाढते.