ट्रॅक्टरपासून तर स्प्रेयर्सपर्यंत मिळणार अनुदान, जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत...!

10-05-2025

ट्रॅक्टरपासून तर स्प्रेयर्सपर्यंत मिळणार अनुदान, जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत...!

ट्रॅक्टरपासून तर स्प्रेयर्सपर्यंत मिळणार अनुदान, जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत...!

सातारा जिल्हा परिषदेमार्फत सन २०२५-२६ मध्ये शेती उपयोगी यंत्रसामग्री खरेदीसाठी विशेष योजना राबवली जात आहे. जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरात अत्यावश्यक अवजारे दिली जाणार आहेत.

या योजनेत कोणकोणती अवजारे मिळणार?

शेतकऱ्यांसाठी पुढील यंत्रसामग्री मिळू शकते:

  • पेरणीयंत्र, पाचटकुट्टी, खोडवा कटर, पल्टी नांगर
  • पॉवर विडर, कडबाकुट्टी यंत्र (2 HP)
  • ताडपत्री (कॅन्व्हास/HDPE)
  • ट्रिपल पिस्टन स्प्रेअर (इंजिन/मोटारसह)
  • विजेचे पंप संच (3 HP, 5 HP, 7.5 HP)
  • HDPE/PVC पाइप (63mm, 75mm, 90mm)
  • मधपेटी (Bee Box)

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा. अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:

  • सातबारा व खाते उतारा (अलीकडील 3 महिन्यांचे)
  • आधार कार्ड, रेशन कार्ड
  • बँक पासबुक (राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँक)
  • छोटे कुटुंब प्रमाणपत्र
  • पशुधन विकास अधिकाऱ्याचा दाखला (कडबाकुट्टीसाठी)
  • वीजबिल, विहीर परवाना (पंप/पाईपसाठी)
  • ट्रॅक्टर आरसी बुक (जर यांत्रिकीकरणसाठी अर्ज करत असाल)

सर्व कागदपत्रे साक्षांकित करून अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – १५ जून २०२५:

  • शेतकऱ्यांनी ही सुवर्णसंधी गमावू नये!
  • मार्गदर्शक सूचना वाचून अचूकपणे अर्ज सादर करा.
  • आपल्या शेताच्या गरजेनुसार योग्य अवजारे निवडा.

शेती अवजारे, अनुदान योजना, government scheme, sarkari yojna, tractor, farming equipment, पेरणीयंत्र खरेदी, पॉवर विडर, ट्रॅक्टर अनुदान, स्प्रेअर यंत्र, मधपेटी यंत्र, ऑनलाईन अर्ज, कृषी अनुदान, जिल्हा परिषद, online arja

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading