Tur market : बाजारात तुरीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, लवकरच १२ हजारांचा टप्पा गाठणार
25-01-2024
Tur market : बाजारात तुरीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, लवकरच १२ हजारांचा टप्पा गाठणार
तुरीच्या दराने १० हजारांचा टप्पा ओलाडल्यांने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड कायम आहे. मात्र, सध्या कापूस आणि सोयाबीनच्या दरांत चढउतार पाहायला मिळत आहे.
Tur Rate : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सद्यस्थित राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीचे दर दहा हजार रूपयांवर पार झालेले आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड कायम आहे. या बाजारात १० हजार ४०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे तूरीला भाव मिळतो आहे. येत्या काही दिवसांत तूरीचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता बाजार समितीतील कृषी अभ्यासकांनी वर्तविली. दरम्यान या हंगामात देशातील तुरीच उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय, सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी आहे.
कापूस आणि सोयाबीनला अपेक्षानुसार भाव नसल्याने शेतकऱ्यांना तूरीकडून अपेक्षा उरल्या होत्या. परंतु तुरीला या हंगामातील सर्वांधिक उच्चांकी भाव मिळाल्यानं कापूस आणि सोयाबीनच्या दरापासून निराशा असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.
तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड सुरू-
Tur market : अकोला कृषी बाजार समितीत मागील वर्षातील १ डिंसेबर २०२४ रोजी तुरीला किमान भाव ८ हजार पासून कमाल भाव १० हजार इतका होता. त्यानंतर सातत्याने तुरीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. या नववर्षात तुरीच्या दरात सुधरणा होत असून दरवाढीचा ट्रेंड सुरू आहे, अकोल्याच्या बाजारात २ जानेवारीला तूरीला किमान भाव ७ हजार पासून ८ हजार ६८० रूपये असा मिळाला होता. त्यानंतर तुरीच्या दरात तेजी कायम असून ६ जानेवारी रोजी ६ हजार ८०० ते ९ हजार ३२० रूपये, तेच १२ जानेवारीचा तुरीचा भाव ७ हजार ५०० ते ९ हजार ३८० रूपये, १७ जानेवारीला कमीत कमी ६ हजार ८६० पासून ९ हजार ५६० रूपये क्विंटलमागे भाव होता.
२० जानेवारी रोजी तुरीनं दहा हजार रूपयांचा टप्पा गाठला असून या दिवशी ७ हजार ४०० ते १० हजार २८५ रूपये असा दर मिळाला. काल मंगळवारी तुरीला (२३ जानेवारी) ७ हजार ते कमाल भाव १० हजार ३४५ रूपये होता. या दरात आज बुधावरी ५५ रुपयांनी क्विंटलमागे वाढ असून सद्यस्थित तूरीला १० हजार ४०० रूपये असा प्रतिक्विंटल भाव आहे. तर सरासरी भाव ८ हजार ८०० रूपयांवर असून आज १ हजार ३८३ एवढी क्विंटल तुरीची आवक झाली आहे. दरम्यान गेल्या सात दिवसांत ९ हजार ३४२ क्विंटल एवढी तुरीची आवक झालीय.
दरम्यान तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास लवकरचं आगामी दिवसात हे भाव सहजपणे ११ हजारांचा टप्पा गाठू शकणार, अंदाजे फ्रेब्रुवारी महिन्याच्या अखरेस तुरीचा भाव १२ हजार रूपयांवर गाठू शकेल, असा अंदाज पुन्हा बाजार समितीचे कृषी अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
यंदा या कारणांमुळे घटलं तूरीच उत्पादन-
Tur production : सद्यस्थित तूर सोंगणी व काढणीला सुरुवात झाली आहेय. यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या उशिरानं झाल्याने हंगाम लांबला होता. दूसरीकड़ं अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट, तसेच तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा तडाखा. त्यानंतर ढगाळ वातावरण, अन् अळींच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झालंय. म्हणून जिल्ह्यात तूर उत्पादनात प्रचंड घट झाली, आज शेतकऱ्यांना एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन झाल्याचं दिसून आलं.
कापूस अन् सोयाबीनला असा आहे भाव-
Market rate : तुरी सारखीच कापूस अन् सोयाबीन उत्पादनाची गती या हंगामात झाली आहे. एकरी चार-पाच क्विंटल उप्तादन शेतकऱ्यांना झाले आहे. दरम्यान अकोला बाजारात आज कापसाला ६ हजार ५३० पासून कमाल भाव ७ हजार १८० रूपये क्विंटलमागे भाव मिळाला. तर सोयाबीनला ४ हजार २५० पासून ४ हजार ४९५ रूपये असा भाव मिळाला. सध्यस्थित कापूस आणि सोयाबीन दरात चढ़उतार पाहायला दिसत आहे.