मिचाँग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकले, राज्यातही जोरदार पावसाचा इशारा
06-12-2023
मिचाँग चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकले, राज्यातही जोरदार पावसाचा इशारा
तीव्र चक्रीवादळ काल दुपारी समुद्रकिनाऱ्यावर धडकले.
- बंगालच्या उपसागरावर तीव्र चक्रीवादळ मिचाँग दुपारी समुद्रकिनाऱ्यावर धडकले.
- 90 ते 110 किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यासह या प्रणालीने बापतला जवळ धडकले
- वादळाची तीव्रता जमिनीवर येताच कमी होऊ लागली आहे आणि पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- नैऋत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटेपासून मिचाँग चक्रीवादळ घोंघावू लागले आहे.
- सोमवारी (ता. ४)चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर मंगळवारी (ता. ५) दुपारी 12.30 वाजता वादळ किनाऱ्यावर धडकले.
- चक्रीवादळाचे केंद्र ओंगोलेच्या पूर्वेला 20 किमी, बपतलाच्या पूर्वेला 45 किमी, मच्छलीपट्टणमच्या नैऋत्यला 100 किमी आणि नेल्लोरच्या उत्तरेला 120 किमी अंतरावर होते.
- चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील पूनामेल्ली (जि. तिरुवेल्लूर) येथे ३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
- तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये अनेक ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- मुसळधार पावसामुळे किनाऱ्यालगतच्या भागात उंच लता उसळू लागल्या आहेत. पिके, रस्ते, पूल, कालवे, घरे, शेते, पिकांचे नुकसान झाले आहे.