राज्यात ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस पडणार - पंजाबराव डख

03-04-2024

राज्यात ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस पडणार - पंजाबराव डख

राज्यात ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस पडणार - पंजाबराव डख 

आज ४ एप्रिल २०२४, पंजाबराव डख यांचा सतर्कतेचा अंदाज आला आहे, सध्या आपल्या शेतात हळद, कांदा, गहू, हरभरा काढणी चालू आहे, सर्व शेतकरी बांधवानी आपली शेतीतील कामे ७ तारखेच्या आत उरकून घ्यावी कारण…

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे, राज्यात ढगाळ वातावरण तसेच मेघागर्जनेसह अवकाळी  पावसाची शक्यता आहे, त्यासाठी हा सतर्कतेचा अंदाज देण्यात येत आहे

राज्यात ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान विदर्भामध्ये गारपीठ देखील होणार आहे, पश्चिम विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, त्यानंतर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणपट्टी भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे, असे पंजाब डख यांनी सांगितले. 

राज्यात ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान अवकाळीचं संकट आहे आणि हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात असणार आहे सर्वदूर पडणार नाही, म्हणजेच विखुरलेल्या स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे आणि वीज वारा देखील असणार आहे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे, असे पंजाबराव डख यांनी सांगितले, 

हवामानामध्ये काही बदल झाला तर लगेच त्त्याचा सविस्तर अंदाज वेळोवेळी आपण तुम्हाला देत असतो. त्यासाठी आपल्या शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुपला जोडले जा. 👉 शेतीविषयक व्हाट्सअॅप ग्रुप

 

 

rain, mumbai rain, panjabrao dakh, rain to day, havaman andaj, weather forcast ,

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading