मे महिन्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढणार असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला 

08-05-2024

मे महिन्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढणार असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला 

मे महिन्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढणार असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला 

महाराष्ट्रात (Maharashtra) सध्याच्या हवामानात (Weather) मोठा बदल पाहायला मिळत आहे. कुठे ऊन (Heat), तर कुठे पाऊस (Rain) असे भिन्न वातावरण दिसत आहे. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या झळा बसत आहेत, तर काही भागात मुसळधार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) हजेरी लावत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी राज्यात मे महिन्यातही जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात 11 मेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरादार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही भागात गारांचा पाऊस होण्याचाही अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

मे महिन्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढणार

सध्या उन्हाळा सुरु आहे, मात्र, महाराष्ट्रात काही भागात जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवसात मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात 8, 9, 10 आणि 11 मे रोजी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. अनेक भागात मान्सूनप्रमाणे पावसाचा जोर पाहायलामिळणार आहे. 

कोकण
मुंबईसह कोकणत 8 मे ते 11 मे दरम्यान पावसाची शक्याता वर्तवण्यात आली आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे.

विदर्भ
पूर्व विदर्भात 8 ते 11 मे दरम्यान, विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कांदा, कापूस, हळद पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे

मराठवाडा
मराठवाड्यात देखील जोरदार वादळी वारा आणि पावसाची शक्यता आहे. 8 मेपासून पुढील चार दिवस मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रादेखील 11 मेपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता असून याचा कांदासह अनेक पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्र
नाशिकसह उत्तर महाराष्ट्र विभागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता असून तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

unseasonal rain, rain in may, may 2024, weather forcast, may weather forcast, may

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading