जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस : पंजाब डख
25-12-2023
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस : पंजाब डख
पंजाब डख हवामान अंदाज
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या कालावधीमध्ये राज्यात कुठेच पाऊस पडणार नाही असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्याची थंडी:
तसेच या कालावधीमध्ये राज्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे. पंजाबरावांनी उत्तरेकडून जोरदार वारे वाहत असल्याने याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात सध्या गारठा वाढत असल्याचे सांगितले आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस:
मात्र, डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार नसला तरी देखील नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसानेच होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अर्थातच जानेवारी महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना विशेष सावध आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇