Weather : येत्या चार दिवसात कसे राहील राज्यातील हवामान? कुठे पडेल पाऊस?
07-12-2023
Weather : येत्या चार दिवसात कसे राहील राज्यातील हवामान? कुठे पडेल पाऊस?
- भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
- राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगाळ राहील. काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- मिचांग चक्रीवादळाने किनारपट्टी गाठली आहे आणि त्याचे उच्च दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे.
- अत्यंत तीव्र चक्रीवादळ 'मिचांग’ ने काल आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या बापतला येथे धडक दिली.
- आज या अत्यंत तीव्र चक्रीवादळाचे उच्च दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले होते.
- आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या लगतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
- आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- आज राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होते. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- ढगाळ वातावरणही राहील. तर पुढील चार दिवस राज्यात पावसाचा अंदाज नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.
- पावसाळी वातावरण निवळल्याने शेतकरी आता शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.
- मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला आहे. तर प्रशासनाला पंचनाम्याचे काम पूर्ण करण्यास मदत होणार आहे.