Weather Update : 6, 7, 8 डिसेंबरला राज्यात जोरदार पावसाची शक्यता
06-12-2023
Weather Update : 6, 7, 8 डिसेंबरला राज्यात जोरदार पावसाची शक्यता
- आज बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ आहे पण त्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र पूर्व विदर्भामध्ये तसेच पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे
- पूर्व विदर्भात आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस येणार आहे.
- चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. आणि पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती, चांदूरबाजार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस येणार आहे
- मराठवाड्यातल्या लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या काही जिल्ह्यांमध्ये फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.
- राज्यांमध्ये ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे, कारण की अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येणार आहे या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे.
- दक्षिण महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर सांगली, सातारा, पुणे, कोकणपट्टी पूर्ण तसेच नगर, सोलापूर मध्ये पाऊस येणार आहे.
- ११ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्र मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.