शेतकऱ्यांसाठी महत्वाचा हवामान अंदाज, नोव्हेंबर २०२४ पासून थंडी वाढीचा इशारा
09-11-2024
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा हवामान अंदाज, नोव्हेंबर २०२४ पासून थंडी वाढीचा इशारा
नमस्कार मी पंजाब डख, आज 9 नोव्हेंबर 2024 आणि आजपासून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मेसेज द्यायचा आहे, की पाऊस काय येणार नाही उलट थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही.
विशेष म्हणजे थंडीमध्येच वाढ होत जाणार आहे, पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा येथे जास्त गारवा राहणार आहे.
सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त वातावरण ढगाळ राहणार आहे मात्र थंडी राहणार आहे, वातावरणामध्ये धुईचं प्रमाण थोड असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.