पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज : कुठे होणार जोरदार पाऊस, कुठे उघडीप?
05-09-2025

5 ते 9 सेप्टेंबर 2025 हवामान अंदाज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाचं आगमन सुरू आहे. काही भागात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचं नुकसान झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पुढील पाच दिवसांतही राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडणार असला तरी, बहुतांशी भागात पावसाचं प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आजचा हवामान अंदाज: 05-09-2025
जोरदार ते अतिजोरदार पाऊस (ऑरेंज अलर्ट) : रायगड, पालघर, धुळे, नंदूरबार आणि पुणे-नाशिक घाटमाथा
हलका ते मध्यम पाऊस : रत्नागिरी, ठाणे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना
ढगाळ हवामानासह हलक्या सरी : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र
उद्याचा हवामान अंदाज: 06-09-2025
ऑरेंज अलर्ट : पालघर, धुळे, नंदूरबार आणि नाशिक घाटमाथा
हलका ते मध्यम पाऊस : रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, जळगाव
उघडीप : कोकणातील काही भाग, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र
रविवारी
हलका ते मध्यम पाऊस : कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यातील काही ठिकाणे
सोमवारी व मंगळवारी
विदर्भ : अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस
मराठवाडा : नांदेड, परभणी, हिंगोली येथे हलका ते मध्यम पाऊस