भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी काय आहे अनुदान आणि पात्रता..?
सन २०१८-१९ पासून राज्यामध्ये भाऊ साहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांनासुद्धा लाभ घेता येणार आहे. ही योजना शासनाच्या कृषी विभागा मार्फत राबवली जात आहे.
या योजनेत भाग घेणार्या शेतकर्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसर्या वर्षी ३०% व तिसर्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात दिला जाणार असून लाभार्थी शेतकर्याने दुसर्या व तिसर्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण तसेच बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% जमीन ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकर्याने स्व खर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे संतुलन राखणे गरजेचे आहे.
योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे. तसेच इतर विभागात कमीत कमी २० गुंठे अशा क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत पात्र लाभार्थांना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे गरजेचे आहे, उर्वरित क्षेत्रासाठी (वरील क्षेत्र मर्यादेच्या लक्षात घेऊन) लाभार्थी या योजनेतून सहभाग घेऊ शकतात. तसेच अल्प, अत्यल्प भूधारक, महिला व दिव्यांग शेतकर्यांना या योजनेत प्राधान्य आहे.
या योजनेत लाभार्थ्याना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येईल:
अ.क्र.
फळपिक
अंतर (मी)
हेक्टरी झाडे संख्या
प्रति हेक्टरी कमाल अनुदान मर्यादा (रु.)
1
आंबा कलमे
१० x १०
१००
५३,५६१/-
2
आंबा कलमे (सधन लागवड)
५x५
४००
१,०१,९७२/-
3
काजू कलमे
७५७
२००
५५,५७८/-
4
पेरू कलमे (सधन लागवड)
३४२
२०,२०९०/-
5
पेरू कलमे
६x६
२७७
६२,२५३/-
6
डाळिंब कलमे
४.५४३
७४०
१,०९,४८७/-
7
संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे
६x६
२७७
६२,५७८/-
8
संत्रा कलमे
६०३
५५५
९९,७१६/-
9
नारळ रोपे वानावली
८x८
१५०
५९,६२२/-
10
नारळ रोपे टी/डी
१५०
६५,०२२/-
11
सीताफळ कलमे
५x५
४००
७२,५३१/-
12
आवळा कलमे
७५७
२००
४९,७३५/-
13
चिंच कलमे
१० x १०
१००
४७,३२१/-
14
जांभूळ कलमे
१० x १०
१००
४७,३२१/-
15
कोकम कलमे
७५७
२००
४७,२६०/-
16
फणस कलमे
१० x १०
१००
४३,५९६/-
17
अंजीर कलमे
४.५०३
७४०
९७,४०६/-
18
चिकू कलमे
१० x १०
१००
५२,०६१/-
काय आहे पात्रता:
लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्यच आहे.
सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकर्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर टिकून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकर्यांचा विचार करण्यात येईल.
लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी आहे संस्थात्मक लाभार्थांसाठी नाही.
शेतकर्यास स्वत:च्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे व संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकर्यास स्वत:च्या हश्याच्या मर्यादेत लाभ घेऊ शकतील.
७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र सोडून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकर्यास लाभ घेता येईल.
काय आहेत आवश्यक कागदपत्रे:
७/१२ व 8-अ उतारा.
हमीपत्र.
संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमती पत्र.