कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोणत्या यंत्रासाठी किती अनुदान…?

07-05-2025

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोणत्या यंत्रासाठी किती अनुदान…?

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोणत्या यंत्रासाठी किती अनुदान…?

शेती अधिक सुलभ आणि आधुनिक बनवण्यासाठी केंद्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme) हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच त्याच्याशी संबंधित विविध अवजारांच्या खरेदीसाठी मोठं सरकारी अनुदान दिलं जाणार आहे.

204 कोटींच्या निधीला मंजुरी:

2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 204.14 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये 122.48 कोटी रुपये केंद्र शासनाकडून आणि 81.65 कोटी रुपये राज्य शासनाकडून खर्च केला जाणार आहे. या निधीचा वापर सहा वेगवेगळ्या घटकांसाठी केला जाणार आहे.

कोणत्या बाबींवर मिळणार अनुदान?

या योजनेअंतर्गत खालील प्रकारच्या यंत्रांसाठी अनुदान दिलं जाणार आहे:

  • पावर ट्रीलर
  • स्वयंचलित शेती अवजारे
  • ट्रॅक्टरचे सहाय्यक अवजारे
  • मनुष्य व पशुचलित यंत्र
  • हार्वेस्टर मशीन
  • महिला सक्षमीकरणासाठी मल्टी टूल कॅरिअर

तसेच 416 अवजार बँकांचे स्थापन देखील करण्यात येणार आहे जेणेकरून सामायिक वापरासाठी उपकरणे उपलब्ध होतील.

कोणाला किती अनुदान मिळणार?

  • SC/ST, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी५०% किंवा ₹1,25,000 पर्यंत
  • इतर शेतकरी४०% किंवा ₹1,00,000 पर्यंत

मात्र, लक्षात ठेवा की या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रत्यक्ष अनुदान नाही, तर ट्रॅक्टरशी संबंधित अवजारांवरच अनुदान मिळणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करा:

या योजनेसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल (MahaDBT) वरून अर्ज करणे आवश्यक आहे. पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर पात्रतेनुसार अनुदान वितरित केले जाईल. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

नमो ड्रोन निधी आणि महिलांसाठी विशेष योजना:

या अभियानाअंतर्गत महिलांसाठी SSC-G अंतर्गत मल्टी टूल कॅरिअर तयार करण्यात येणार असून 18 कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत 645 महिलांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

अनुदान माहिती, शेती यंत्र, महाडीबीटी अर्ज, शेतकरी अनुदान, ट्रॅक्टर योजना, अवजार बँक, केंद्र योजना, महिला अनुदान, ड्रोन योजना, anudan yojna, sarkari anudan, government scheme, tractor, maha dbt

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading