Cultivation : शून्य मशागत तंत्र म्हणजे काय?
23-01-2024
शून्य मशागत तंत्र म्हणजे काय?
- संवर्धित शेती पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी विकसित केलेले तंत्र म्हणजे ‘शून्य मशागत तंत्र' होय.
- संवर्धित शेती करण्यासाठी राज्यात कोल्हापूर येथील प्रगत शेतकरी आणि कृषितज्ञ श्री. प्रतापराव चिपळूणकर यांनी स्वतःच्या शेतीतील प्रयोगातून विना नांगरणीची शेती सिद्ध करून दाखवली आहे.
- संवर्धित शेतीचे शास्रीय विश्लेषण करताना त्यांनी जमिनीच्या सुपिकतेचे आणि विशेष करून सेंद्रिय कर्बाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
- कृषिरत्न श्री. चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी सगुणा बाग, ता. कर्जत, जि. रायगड येथे भात पिकावर आधारित पीक पद्धतीकरिता शुन्य मशागतीसाठी उपयुक्त म्हणून सगुणा राईस तंत्र (एसआरटी) विकसित केले आहे.
- एसआरटी तंत्रामध्ये आणि विना नांगरणीच्या शेतीमध्ये सुरवातीलाच गादी वाफ्यावर पिकांची लागवड केली जाते व नंतर गादीवाफे न मोडता आणि कोणतीही मशागत म्हणजेच नांगरणी, कुळवणी, वखरणी न करता तसेच पाभरीने पेरणी न करता पुढील पिकांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते.
- तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निंदनी, भांगलणी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो.
- पिकांची काढणी करताना पिके जमिनीलगत कापून घेतली जातात आणि खोडाचे अवशेष (राख), धसकटे व मुळे तशीच ठेवली जातात.
- पिके किंवा तणे मुळासकट उपटून काढली जात नाहीत त्यामुळे पिकांची व तणांची मुळे जमिनीत
- राहतात, कुजतात आणि त्यापासून संद्रिय खत तयार होते.
- शून्य मशागत तंत्र राज्यातील भात, सोयाबीन, कापूस, मका, सुर्यफुल, हरभरा, झेंडू इ. पिकांसाठी कायदेशीर असल्याचा प्रयोगशील शेतकऱ्यांना अनुभव येत आहे.
- सदर तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, इतर तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, हरभरा, इतर कडधान्ये, भुईमूग, सुर्यफुल, मोहरी, जवस, तीळ, इतर तेलबिया, कांदा, भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी पिकांची लागवड करणे शक्य आहे.
- हळद, आले, बटाटा, रताळे, गाजर अशा पिकांचा जमिनीखाली पावणारा बहुतांशी भाग काढण्यासाठी जमिनीची मोठी खांदणी करावी लागत असल्याने या पिकांमध्ये शून्य मशागत तंत्र वापरण्यावर काही मर्यादा आहेत,