कपाशी बियाण्याची निवड कशी करावी? कापूस वाणाची निवड करताना या गोष्टीकडे लक्ष्य द्या

कपाशी बियाण्याची निवड कशी करावी? कापूस वाणाची निवड करताना या गोष्टीकडे लक्ष्य द्या
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Krushi Kranti Editorial Desk

Published:

कपाशी बियाण्याची निवड कशी करावी? कापूस वाणाची निवड करताना या गोष्टीकडे लक्ष्य द्या

  • कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा. 
  • सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे. 
  • आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा.
  • वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे. 
  • रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील/ प्रतिकारक्षम वाण असावा. 
  • शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणार्‍या बोंडांचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
  • बागायती लागवडीसाठी माध्यम ते उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
  • बोंडांचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा.
  • पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, त्यामुळे कपाशीला चांगला बाजारभाव मिळू शकेल. 
  • वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकर्‍यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची निवड करावी.

अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. 

source : krishijagran

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा