फक्त हे धान्य फेका व करा लव्हाळयाचा नायनाट

फक्त हे धान्य फेका व करा लव्हाळयाचा नायनाट
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Krushi Kranti Editorial Desk

Published:

फक्त हे धान्य फेका व करा लव्हाळयाचा नायनाट

 

आज महाराष्ट्रातील शेतकरी तनांचा  नायनाट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. परंतु बऱ्याचशा तन नाशकांची फवारणी करून सुद्धा परिणाम दिसत नाही त्यासाठी आपण आज लव्हाळा या तनाचा नायनाट करण्यासाठी काय केले पाहिजे हेआपण जाणून घेणार आहोत.

१ किलो राजगीर्‍यास 20 मिली सोईल चार्जेर बीजप्रक्रिया करून नंतर ते बी आणि २० किलो वाळू एकत्र मिसळून १ एकर लव्हाळा बाधीत क्षेत्रावर फेकून त्याला पाणी द्यावे. म्हणजे ८ - १० दिवसात राजगीरा उगवून येतो. 

३-४ पाण्याच्या पाळ्या ८ -१० दिवासांनी द्याव्यात, म्हणजे १।। ते २ महिन्यात हा राजगीरा १।। ते २ फूट साधारण गुडघ्याएवढा झाला म्हणजे त्याचे सोटमूळ हे लव्हाळ्याच्या गाठीवर जाऊन आदळते व त्याला मारून टाकते. एका लव्हाळ्याच्या झाडाच्या मुळावर एकूण ७ गाठी असतात.

ह्या सर्व मरतात मग आपल्याजवळ मार्केट असल्यास तेथे राजगिर्‍याची भाजी विकता येते. नवरात्रात उपवासासाठी ही भाजी वापरतात. भाजीला दर नसल्यास नांगरटी खाली राजगिर्‍याची भाजी सेंद्रिय खत म्हणून गाडून टाकावी. 

अनेक लोकांनी हा प्रयोग करून त्याचे निष्कर्ष कृषी विज्ञानमध्ये छापले आहेत. आपणही असा प्रयोग करून आपले अनुभव कळवावेत, म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

source : krishijagran

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा