१५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा, त्यानंतर होतोय खोडकिडीचा प्रादुर्भाव

१५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा, त्यानंतर होतोय खोडकिडीचा प्रादुर्भाव
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Krushi Kranti Editorial Desk

Published:

१५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा, त्यानंतर होतोय खोडकिडीचा प्रादुर्भाव

 

सध्या राज्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे उस तुटून गेल्यानंतर काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अनेक शेतकरी हे उसाचा खोडवा ठेवतात. यामुळे याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

खोडवा पीक घेताना सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर घेतलेल्या खोडवा उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे उत्पादन घटते.

तसेच खोडवा ठेवायची जमीन सुपीक आणि निचऱ्याची असावी. हे पीक १२ ते १४ महिने वयाचे असताना उसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो तसतसे खोडव्याचे उत्पादन कमी होत जाते.

उशिरा तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवला तर त्याचे उत्पादन जेवढे कमी होते तेवढा खर्च शेतकऱ्यांना होतो. यामुळे हाती काही लागत नाही. म्हणून १५ फेब्रुवारी नंतर तोडलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.

खोडवा ठेवताना पाचट जाळणेपाचट शेताबाहेर काढने, एक आड एक सरीत ठेवणे, बुडख्यांवर पाचट ठेवणे, रासायनिक खतांचा फेकून वापर करणे, आंतरमशागत व मोठी बांधणी करणे, बगला फोडणे, या गोष्टी करू नयेत. तरच उत्पादनात वाढ होणार आहे.

source : krishijagran

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा