आता रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय..

आता रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय..
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Krushi Kranti Editorial Desk

Published:

आता रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय..

 

मोदी सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य देणार असल्याचं आधीच जाहीर केलं. वन नेशन वन रेशन ही केंद्र सरकारची महत्त्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना देशभरात लागू झाली. यानंतर आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे.

याचे अनेक फायदे आहेत, यामुळे आता रेशनधारकांना अचूक अन्नधान्य मिळेल. यामुळे मापात पाप होणार नाही. या निर्णयामुळे देशातील कोटी रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुकानदार शिधा देताना काटा मारतात.

अनेकदा यामुळे मोठ्या प्रमाणावर काळा बाजार देखील केला जातो. अनेकजण मापात पाप करतात, अशा अनेक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. मात्र हा नियम लागू झाल्याने मापात पाप करण्याची शक्यताच नाहीशी झाली आहे, यामुळे सर्वांना नियमानुसार धान्य मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार बदल करण्यात आला आहे.

कायद्यानुसार योग्य अन्नधान्य मिळावं, यासाठी रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल इलेक्ट्रॉनिक तराजूसोबत जोडण्यात यावं, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात संशोधन करण्यात आलं आहे. यामुळे याचा सर्वांना फायदा होणार आहे.

याबाबत केंद्र सरकार अनेक दिवसांपासून विचार करत होते, यामुळे आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे. यामुळे धान्य देखील वाढेल आणि गरिबांना त्याचा फायदा होईल.

source : krishijagran 

अश्याच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.