डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना: नवीन विहीर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
21-01-2026

डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना: नवीन विहीर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनामार्फत विविध लाभदायक योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना.
या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था मिळावी, जमिनीतील ओलावा टिकावा आणि सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी नवीन विहीर (New Well) घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
पण अनेक शेतकऱ्यांचे अर्ज फक्त कागदपत्रांची अपूर्णता किंवा तांत्रिक दाखले नसल्यामुळे अडून राहतात. म्हणूनच या लेखात आपण नवीन विहीर योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची एकदम स्पष्ट आणि सोपी यादी पाहणार आहोत.
योजना कोणासाठी आहे?
डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही प्रामुख्याने:
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी
कृषि विभागामार्फत राबवली जाणारी योजना आहे
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे:
शेतीला नियमित पाणीपुरवठा मिळणे
सिंचनासाठी शाश्वत व्यवस्था तयार करणे
कमी पावसाच्या भागातही शेती टिकवणे
पाण्याच्या अभावामुळे होणारे नुकसान कमी करणे
नवीन विहिरीसाठी लागणारी कागदपत्रे
खाली दिलेली सर्व कागदपत्रे अर्ज करताना तयार ठेवल्यास तुमचा अर्ज सहज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
1) जात आणि जमीन संबंधित कागदपत्रे
1) जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
2) ७/१२ उतारा (Satbara)
जमिनीची मालकी व तपशील दर्शवणारा ७/१२ उतारा
3) ८-अ उतारा
जमिनीची धारणा (Holding) आणि क्षेत्रफळ स्पष्ट करणारा ८-अ उतारा
2) उत्पन्न आणि प्रतिज्ञापत्र
4) उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
अर्जदार शेतकऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र
5) प्रतिज्ञापत्र (₹100 Stamp Paper)
१०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र (Affidavit)
(यात योजनेच्या अटींचे पालन, चुकीची माहिती न देणे इ. मुद्दे असतात.)
3) अपंगत्व असल्यास
6) अपंगत्व प्रमाणपत्र
लाभार्थी अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र जोडावे.
महसूल व तांत्रिक दाखले
हे कागदपत्रे अर्ज मंजूरीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात.
4) तलाठीचा दाखला
तलाठीकडून खालील मुद्द्यांचा दाखला आवश्यक असतो:
एकूण धारणा क्षेत्र 0.40 ते 6 हेक्टरच्या मर्यादेत असल्याचा दाखला
सध्या विहीर नसल्याचा दाखला
प्रस्तावित विहीर ही जुन्या विहिरीपासून किमान 500 फूट अंतरावर असल्याचा दाखला
सर्व्हे नंबर नकाशा व चतु:सीमा (Boundary Details)
तलाठीचा दाखला चुकीचा/अपूर्ण असेल तर अर्ज लांबतो. म्हणून हे सर्व मुद्दे स्पष्ट लिहिलेले असावेत.
5) भूजल सर्वेक्षण विभागाचा पाणी उपलब्धता दाखला
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून (Groundwater Survey & Development Agency)
पाणी उपलब्धतेचा दाखला आवश्यक आहे.
म्हणजे त्या ठिकाणी विहीर घेण्यास पाणी उपलब्ध आहे हे प्रमाणित करणे.
इतर आवश्यक कागदपत्रे
6) कृषि अधिकारी क्षेत्रीय पाहणी + शिफारसपत्र
कृषि विभागाकडून क्षेत्रीय पाहणी (Field Inspection)
आणि त्यांचे शिफारसपत्र (Recommendation)
7) गट विकास अधिकारी (BDO) यांचे शिफारसपत्र
पंचायत समिती/गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र आवश्यक
8) विहीर जागेचा फोटो (Beneficiary with Landmark)
ज्या ठिकाणी विहीर करायची आहे त्या जागेचा फोटो
फोटोमध्ये महत्त्वाची खूण (Landmark) आणि लाभार्थी स्वतः दिसणे आवश्यक
9) ग्रामसभेचा ठराव (Gram Sabha Resolution)
ग्रामसभेने विहीर करण्यास मान्यता दिलेला ठराव जोडणे गरजेचे
शेतकऱ्यांसाठी सोपी “चेकलिस्ट”
जात प्रमाणपत्र (SC/नवबौद्ध)
7/12 उतारा
8-अ उतारा
उत्पन्न प्रमाणपत्र
₹100 स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र
(असल्यास) अपंगत्व प्रमाणपत्र
तलाठीचा दाखला (धारणा, विहीर नसणे, 500 फूट अंतर, नकाशा/चतु:सीमा)
भूजल विभागाचा पाणी उपलब्धता दाखला
कृषि अधिकारी पाहणी + शिफारस
BDO शिफारसपत्र
विहीर जागेचा फोटो (लाभार्थीसह)
ग्रामसभा ठराव