हिंगोली बाजार समितीमध्ये भुसार शेतमाल विक्री बंद…

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

हिंगोली बाजार समितीमध्ये भुसार शेतमाल विक्री बंद…

हिंगोली बाजार समितीमध्ये भुसार शेतमाल विक्री बंद…

हिंगोली मधील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट ९ सप्टेंबरपासून ते दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

नवे सोयाबीन काढणीस सुमारे महिनाभराचा कालावधी आहे. सध्या जुने तसेच उन्हाळी सोयाबीन विक्री करिता येत आहे. तसेच मूग आणि उडीदसुद्धा येत आहे. पण, आवक कमी आहे. त्यातच सध्या गणेशोत्सव सुरू आहे.

त्यामुळे दि. ९ ते २० सप्टेंबरदरम्यान भुसार शेतमालाचे बीट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद काळात शेतकऱ्यांनी भुसार शेतमाल विक्रीसाठी आणू नये.