शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु…!
29-05-2025

शेअर करा
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज सुरु…!
बियाणे अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. यंदाच्या हंगामात ही योजना पुन्हा सुरु झाली असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करून फायदा घेण्यासाठी ही मार्गदर्शिका नक्की वाचा!
अर्जासाठी आवश्यक अटी:
- फर्मर आयडी अनिवार्य आहे.
- अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर स्वीकारले जातील.
- अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
अर्ज कसा करायचा? (स्टेप बाय स्टेप प्रक्रिया):
MahaDBT पोर्टलवर लॉगिन करा:
- दिलेल्या लिंकवर क्लिक करा (महा डीबीटी)
- MahaDBT पोर्टल उघडल्यानंतर फर्मर आयडी प्रविष्ट करा
- ‘ओटीपी पाठवा’ या बटनावर क्लिक करा
ओटीपी प्रमाणीकरण करा:
- तुमच्या रजिस्टर मोबाईलवर आलेला ओटीपी टाका
- ‘ओटीपी तपासा’ वर क्लिक करा
प्रोफाईल अपडेट करा:
- नवीन पेज उघडल्यावर तुमची प्रोफाईल अपूर्ण दाखवली जाईल
- जात, अपांगत्व यासंबंधी माहिती व कागदपत्रे भरून ‘सेव’ बटन वर क्लिक करा
योजना निवडा व अर्ज करा:
- डावीकडे ‘घटकासाठी अर्ज करा’ ऑप्शनवर क्लिक करा
- तुमच्या समोर विविध योजना (उदा. बियाणे वितरण, प्रत्यक्षिक, औषधे, खते) दिसतील
- आवश्यक योजना निवडा आणि पुढे जा
घटक निवडताना:
जर ‘प्रमाणित बियाणे वितरण’ मध्ये हवे असलेले बियाणे दिसले नाही, तर ‘फ्लेक्सी घटक’ हा पर्याय निवडून बघा.
प्रस्तावित क्षेत्र व अर्ज सादर करा:
- प्रस्तावित क्षेत्राची माहिती भरा
- ‘जतन करा’ वर क्लिक करा
- अजून घटक निवडायचे असल्यास Yes किंवा No निवडा
- शेवटी ‘अर्ज सादर करा’ बटनावर क्लिक करा
- ‘ओके’ व ‘पहा’ बटने क्लिक करून माहिती तपासा
- अटी मान्य करून पेमेंट पूर्ण करा