विशिष्ट ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना थेट लाभाची सुविधा…

विशिष्ट ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना थेट लाभाची सुविधा…
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Suraj Ghodke (null)

Published:

विशिष्ट ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना थेट लाभाची सुविधा…

शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणे विशिष्ट ओळखपत्र देण्याकरिता नोंदणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

तसेच मार्च महिन्यापर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्टही ठेवले आहे, अशी माहिती कृषी सचिवांनी दिली आहे. मंत्रिमंडळाने अलीकडेच २,८१७ कोटींच्या डिजिटल कृषी मिशनला मंजुरी दिली होती असेही त्यांनी सांगितले.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहेत. 

१९ राज्यांनी यावर आधीच काम सुरू केले आहे. विशेष ओळखपत्रामुळे पिकांना किमान आधारभूत किंमत, किसान क्रेडिट कार्यक्रमातील विविध योजनांमधून दिली जाणारी मदत शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही अडचणींशिवाय पोहोचण्यास मदत होईल.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा