CMEGP योजने अंतर्गत शेळीपालन व्यवसायाला मिळवा कर्ज व अनुदान

CMEGP योजने अंतर्गत शेळीपालन व्यवसायाला मिळवा कर्ज व अनुदान
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: sanchit ramdas shinde

Published:

CMEGP योजने अंतर्गत शेळीपालन व्यवसायाला मिळवा कर्ज व अनुदान, वाचा योजनेची संपूर्ण माहिती

शेळी पालन व्यवसायासाठी शासनाकडून अनेक योजनांमधून अनुदान दिले जाते. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना म्हणजे 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' (CMEGP).

 

या कार्यक्रमांतर्गत शेळीपालन व्यवसायासाठी प्रकल्प खर्चाच्या १० ते ३५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान (Subsidy) मिळते. ग्रामीण भागातील अर्जदारांना ३५ टक्के आणि शहरी भागातील अर्जदारांना २५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळू शकते. यासाठी तुम्हाला 'महा-सीईएमजीपी'च्या (Maha-CMEGP) अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. चला तर मग, या योजनेची सविस्तर माहिती समजून घेऊयात.

 

अनुदानाचे स्वरूप कसे आहे?

 शेळीपालनासाठी जर तुमचा ५ लाखांचा प्रकल्प असेल, तर अनुदानाचे गणित खालीलप्रमाणे राहील:

 

अ) सामान्य प्रवर्ग (ग्रामीण भाग):

  • प्रकल्प खर्च: ५ लाख रुपये

  • तुमचे स्वतःचे योगदान: १.२५ लाख रुपये

  • बँक कर्ज: ३.७५ लाख रुपये

  • मिळणारे अनुदान: १.२५ लाख रुपये

  •  

ब) विशेष प्रवर्ग (SC/ST/महिला/OBC/अल्पसंख्याक/माजी सैनिक/दिव्यांग, ग्रामीण भाग):

  • प्रकल्प खर्च: ५ लाख रुपये

  • तुमचे स्वतःचे योगदान: १.२५ लाख रुपये

  • बँक कर्ज: ३.७५ लाख रुपये

  • मिळणारे अनुदान: १.७५ लाख रुपये

  •  

कोण अर्ज करू शकतो? (पात्रता)

  • १८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र आहे.

  • ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार युवक आणि युवती.

  • ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रबळ इच्छा आहे.

  • यासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची अट नाही.

  •  

आवश्यक कागदपत्रे 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • रहिवासी दाखला

  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • शैक्षणिक पात्रतेचा दाखला

  • प्रकल्प अहवाल (Project Report)

  • पासपोर्ट साईझ फोटो

  • बँक खाते पासबुक (Bank Passbook)

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा